उद्धव ठाकरेंचा सोमवारी नवी मुंबई दौरा; लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 04:40 PM2024-03-02T16:40:33+5:302024-03-02T17:02:45+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खालापूर, उरण विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे यांचा ४ फेब्रुवारी रोजी झंझावाती दौरा

Uddhav Thackeray's visit to Navi Mumbai on Monday; The trumpet of the Lok Sabha elections will be blown | उद्धव ठाकरेंचा सोमवारी नवी मुंबई दौरा; लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार

उद्धव ठाकरेंचा सोमवारी नवी मुंबई दौरा; लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार

उरण : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खालापूर,उरण  या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ४ मार्च रोजी तीन सभा होणार आहेत.या झंझावाती जनसंवाद दौऱ्यात महाविकास
आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट ) ,कॉग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) , शेकाप, समाजवादी पार्टी आदी घटक पक्षांचे नेते , पुढारी उपस्थित राहणार असल्याची माहिती उरणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी  शनिवारी (२) पनवेल,उरण, खोपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

मावळ विधानसभा मतदारसंघातील  पनवेल, खालापूर,उरण विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याला माजी खासदार अनंत गीते, मिलिंद नार्वेकर, संजोग वाघेरे पाटील, महाआघाडीतील शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, कॉग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,आर.सी.पाटील,राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे प्रशांत पाटील समाजवादी पार्टीचे अनंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या जनसंवाद दौऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतरही होऊ घातलेला विरार-अलिबाग कॉरीडॉर, नैना,तिसरी मुंबई, नियोजित एमआयडीसी प्रकल्प खोपटा नवनगर प्रकल्प,सिडकोचे प्रलंबित विविध प्रश्न,उरण येथील रखडलेल्या १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, इंजिनिअरिंग कॉलेज,रानसई धरणाची उंची आणि गाळाची समस्या,रखडत सुरू असलेले करंजा मच्छीमार बंदर, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, जेएनपीए व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अद्यापही न सुटलेला साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न, जेएनपीए विस्थापित करून पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा प्रश्न, बेरोजगारी , नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि राज्यातील  महायुतीच्या अनागोंदी, मनमानी कारभाराचा उध्दव ठाकरे ठाकरी भाषेत  समाचार घेणार आहेत.

उरण येथील द्रोणगिरी नोडमधील  शांतेश्वरी मैदानावर 

सायंकाळी होणाऱ्या  जनसंवाद मेळाव्यात परिसरातील समस्यांचाही उहापोह केला जाणार असल्याची माहिती उरणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी  शनिवारी उरण येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण संपर्क प्रमुख दिपक भोईर, पनवेल येथील ज्येष्ठ शिवसैनिक काशिनाथ कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Uddhav Thackeray's visit to Navi Mumbai on Monday; The trumpet of the Lok Sabha elections will be blown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.