शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

उद्धव ठाकरेंचा सोमवारी नवी मुंबई दौरा; लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 4:40 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खालापूर, उरण विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे यांचा ४ फेब्रुवारी रोजी झंझावाती दौरा

उरण : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खालापूर,उरण  या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ४ मार्च रोजी तीन सभा होणार आहेत.या झंझावाती जनसंवाद दौऱ्यात महाविकासआघाडीतील शिवसेना (ठाकरे गट ) ,कॉग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) , शेकाप, समाजवादी पार्टी आदी घटक पक्षांचे नेते , पुढारी उपस्थित राहणार असल्याची माहिती उरणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी  शनिवारी (२) पनवेल,उरण, खोपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

मावळ विधानसभा मतदारसंघातील  पनवेल, खालापूर,उरण विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याला माजी खासदार अनंत गीते, मिलिंद नार्वेकर, संजोग वाघेरे पाटील, महाआघाडीतील शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, कॉग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,आर.सी.पाटील,राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे प्रशांत पाटील समाजवादी पार्टीचे अनंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या जनसंवाद दौऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतरही होऊ घातलेला विरार-अलिबाग कॉरीडॉर, नैना,तिसरी मुंबई, नियोजित एमआयडीसी प्रकल्प खोपटा नवनगर प्रकल्प,सिडकोचे प्रलंबित विविध प्रश्न,उरण येथील रखडलेल्या १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, इंजिनिअरिंग कॉलेज,रानसई धरणाची उंची आणि गाळाची समस्या,रखडत सुरू असलेले करंजा मच्छीमार बंदर, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, जेएनपीए व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अद्यापही न सुटलेला साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न, जेएनपीए विस्थापित करून पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा प्रश्न, बेरोजगारी , नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि राज्यातील  महायुतीच्या अनागोंदी, मनमानी कारभाराचा उध्दव ठाकरे ठाकरी भाषेत  समाचार घेणार आहेत.

उरण येथील द्रोणगिरी नोडमधील  शांतेश्वरी मैदानावर 

सायंकाळी होणाऱ्या  जनसंवाद मेळाव्यात परिसरातील समस्यांचाही उहापोह केला जाणार असल्याची माहिती उरणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी  शनिवारी उरण येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण संपर्क प्रमुख दिपक भोईर, पनवेल येथील ज्येष्ठ शिवसैनिक काशिनाथ कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईBJPभाजपा