शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

रोडपालीत अल्ट्रा मॉडर्न उद्यान; सिडकोचा प्रकल्प, ५७ लाख रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:01 AM

सिडकोने साडेबारा टक्के योजनेंतर्गत रोडपाली विभागाचा विकास केला आहे; परंतु या ठिकाणी विरंगुळ्यासाठी एकाही उद्यानाची सुविधा देण्यात आली नाही.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : सिडकोने साडेबारा टक्के योजनेंतर्गत रोडपाली विभागाचा विकास केला आहे; परंतु या ठिकाणी विरंगुळ्यासाठी एकाही उद्यानाची सुविधा देण्यात आली नाही. या संदर्भात स्थानिक रहिवासी व सामाजिक संस्थांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत रोडपाली सेक्टर २० येथील सुमारे दीड एकर क्षेत्रफळाच्या जागेवर अत्याधुनिक दर्जाचे अल्ट्रा मॉडर्न उद्यान उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या कामासाठी निविदाही मागविण्यात आल्या असून, या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ५७ लाख रुपये खर्च निर्धारित करण्यात आला आहे.रोडपालीची जवळपास ७५ टक्के वसाहत साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडावर वसली आहे. उर्वरित २५ टक्के भूखंड सिडकोच्या मालकीचे आहेत. एकूण ६० हेक्टर जमीन सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत खातेदारांनी दिली. मात्र, त्यापैकी चार टक्के क्षेत्र पायाभूत सुविधांकरिता राखीव ठेवले. म्हणजे तितके क्षेत्र प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीतून सिडकोने अगोदरच वर्ग केले; परंतु त्या जागेवर फारशा पायाभूत सुविधा विकसित करण्यात आलेल्या नाहीत. खारघरला पर्याय म्हणून अनेकांनी रोडपालीत घरे घेतली. मात्र, या भागात साधे उद्यानही नाही. याबाबत एकता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षे सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. त्याचबरोबर इतर रहिवासी संघटनांनी सिडकोकडे पत्रव्यवहार केला होता, त्याची दखल घेत सिडकोने या परिसरातील सेक्टर २० मध्ये सुमारे दीड एकर क्षेत्रावर अल्ट्रा मॉडर्न उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत.प्रकल्पाचा खर्च५७ लाख रुपयेरोडपाली येथील सेक्टर २० मधील भूखंड क्र मांक २६ येथे ५५७६ चौ.मी. क्षेत्रफळावर हे उद्यान विकसित होणार आहे. त्याकरिता ५७ लाख खर्च अपेक्षित आहे. यामध्ये संरक्षण भिंत, जॉगिंग ट्रॅक, आसन व्यवस्था, शौचालय तसेच वेगवेगळी झाडे आणि हिरवळ आदीसह अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा असणार आहेत.विरंगुळा केंद्र आणि चिल्ड्रन पार्कचा प्रस्तावएकता सामाजिक सेवा संस्थेचेअध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी सिडकोच्या या आराखडाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर त्या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्कची व्यवस्था करावी,अशी मागणी पत्राद्वारे सिडकोकडे केली आहे.रोडपालीकरिता अत्याधुनिक स्वरूपाचे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. संबंधित कामासाठी नऊ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, एकता सामाजिक सेवा संस्थेने चिल्ड्रन पार्क व विरंगुळा केंद्राची मागणी केली आहे, त्यानुसार हा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला जाईल.- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता, सिडको, कळंबोली

टॅग्स :cidcoसिडको