उमेदचा ‘बायर सेलर मीट’ एक अभिनव उपक्रम:  एकनाथ डवले

By कमलाकर कांबळे | Published: October 4, 2023 09:15 PM2023-10-04T21:15:40+5:302023-10-04T21:16:01+5:30

बुधवार ४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्स च्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर सेलर मिट’ चे आयोजन करण्यात आले होते.

umaid buyer seller meet an innovative initiative said eknath dawle | उमेदचा ‘बायर सेलर मीट’ एक अभिनव उपक्रम:  एकनाथ डवले

उमेदचा ‘बायर सेलर मीट’ एक अभिनव उपक्रम:  एकनाथ डवले

googlenewsNext

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :  मोठ्या कंपन्या आणि खरेदीदार यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे राबविण्यात आलेला ‘बायर सेलर मीट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार असून उमेदच्या  स्वयंसहायता गटाच्या महिलांच्या कृषी व बिगर कृषी उत्पादनांना शास्वत बाजारपेठ मिळवून देणाऱ्या ‘बायर सेलर मीट’ या नाविण्यपूर्ण उपक्रमाला  उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.  असे प्रतिपादन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव  एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. 

बुधवार ४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्स च्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर सेलर मिट’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य परिचालन अधिकारी  परमेश्वर राउत, अवर सचिव धनवंत माळी उपसंचालक शीतल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातील प्रमुख ४१ साखळी व्यवसाय कंपन्यांचे प्रतिनिधींसह राज्यभरातून स्वयंसहाय्यता गटाच्या आणि शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये २८ करार या कार्यक्रमात संपन्न झाले. 
यावेळी प्रधान सचिव  एकनाथ डवले म्हणाले की, ग्रामविकास विभाग उमेद अभियानाच्या माध्यमातून  ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वायत्त होण्यासाठी अनेक प्रकारे मदत करत आहे. आमच्या महिलांची उत्पादने दर्जेदार आहेत, गुणवत्तापूर्ण आहेत. आता त्यांना शास्वत बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. साखळी व्यावसायिक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी पुढे येऊन या महिलांना सक्षम बनण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   

ग्रामीण भागातील उमेदच्या महिलांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असल्याने त्यांनी उत्पादित केलेले कृषी आधारित उत्पादने वेगवेगळ्या कंपनी किंवा साखळी व्यावसायिक यांनी घाऊक प्रमाणात खरेदी करून शेतामालाला चांगला परतावा मिळावा हा  या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.  राज्यभरातील ३४ जिल्ह्यातून उमेद अंतर्गत कार्य करत असलेल्या महिलांच्या प्रतिनिधी आपल्या उत्पादनाच्या किंवा शेतमालाच्या नमुन्यासह  या कार्यक्रमास उपस्थित होत्या. या मीट  मध्ये सोयाबीन, मिरची, हळद, तूर, हरभरा, मका, बाजरी, नाचणी, ज्वारी  यासारखे दर्जेदार धान्य आणि कडधान्य तसेच मसाले, गुळ, मध, फळे, वनौषधी, तेलबिया इत्यादी उत्पादने नमुना स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले होते. खरेदीदार म्हणून ३० पेक्षा जास्त संस्था आणि कंपन्या यांचे प्रतिनिधी हजर होते. सेंद्रिय आणि शुद्धता असलेले उत्पादने महिलांनी उपलब्ध करून दिल्यामुळे खरेदीदार संस्था आणि कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी करार करण्यासाठी उत्साह दाखवला. या कार्यक्रमात खरेदीदार यांनी दाखविलेल्या रुचीमुळे भविष्यात महिलांना शास्वत बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: umaid buyer seller meet an innovative initiative said eknath dawle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.