अनधिकृत बॅनर्समुळे ३ कोटींचा महसूल बुडाला, पनवेल पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:16 AM2020-12-10T01:16:18+5:302020-12-10T01:17:41+5:30

Panvel News : अनधिकृत बॅनरमुळे पालिकेचा सुमारे ३ कोटींचा महसूल बुडला आहे. बॅनर लावण्याकरिता पालिकेने नेमलेल्या कंपनीकडून केवळ २० ते २५ लाखांचा निधी मिळत आहे.

Unauthorized banners lost Rs 3 crore in revenue | अनधिकृत बॅनर्समुळे ३ कोटींचा महसूल बुडाला, पनवेल पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद

अनधिकृत बॅनर्समुळे ३ कोटींचा महसूल बुडाला, पनवेल पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद

Next

पनवेल : अनधिकृत बॅनरमुळे पालिकेचा सुमारे ३ कोटींचा महसूल बुडला आहे. बॅनर लावण्याकरिता पालिकेने नेमलेल्या कंपनीकडून केवळ २० ते २५ लाखांचा निधी मिळत आहे. याचे पडसाद बुधवारी पार पडलेल्या ऑनलाइन स्थायी समितीत उमटले.

सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समिती सभेत मोजकेच विषय मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी सन २०२०-२०२१ ते २०२१ -२०२२ या कालावधीकरिता पनवेल महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या जनजागृतीबाबत बॅनर छपाई करण्यासाठी पालिकेने काढलेल्या निविदेला अथर्व मीडिया वर्ल्ड या ठेकेदाराने कमी दराची निविदा भरल्याने मंजुरी मिळाली आहे. 

स्थायी समितीत या विषयाला मंजुरी मिळाली. मात्र, पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरबाजीमुळे पालिकेचा ३ कोटींपेक्षा जास्त महसूल बुडत असल्याचा आरोप शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला.   तर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अनधिकृत बॅनर वेळेवर काढले जात नसल्याचा आरोप सभागृहात केला. भाजप नगरसेवक  पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने प्रश्न प्रलंबित असताना, मोजकेच विषय स्थायी समिती समोर घेतले जात आहेत. यामुळे पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी शिल्लक राहत असल्याचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. सभापती संतोष शेट्टी यांच्याकडून सर्व विषय मंजूर करण्यात आले.

या विषयांना मिळाली मंजुरी
  पालिकेचे उपशिक्षक ज्ञानेश्वर आलदर यांच्या अपील अर्जावर सुनावणी मंजूर
 पूर्वाश्रमीच्या २३ ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना पालिका अधिनियमानुसार वैद्यकीय खर्चची प्रतिपूर्ती रक्कम मंजूर करणे.
 मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करणे.

कब्रस्तानजवळील ते दुकान रद्द करावे
सध्या मालमत्ता कर हेच उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. अशा परिस्थितीत कोरोडो रुपयांच्या निधीवर पालिका पाणी सोडत असेल, तर हे गंभीर असल्याचे मत अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केले. 
मुकीत काझी यांनी कब्रस्तानजवळ पालिकेने नव्याने बियर शॉपीला परवानगी दिली. पालिकेने पुनर्विचार करून परवानगी रद्द करण्याची मागणी केली. याबाबत माहिती घेऊन सविस्तर माहिती दिली जाईल, असे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी सांगितले.

Web Title: Unauthorized banners lost Rs 3 crore in revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल