पनवेलमध्ये विनापरवाना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर
By Admin | Published: May 3, 2017 05:56 AM2017-05-03T05:56:21+5:302017-05-03T05:56:21+5:30
सध्या लग्न समारंभाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे हा सोहळा पार पाडण्यासाठी व लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी सरार्सपणे ड्रोन कॅमेऱ्यांचा
मयूर तांबडे / पनवेल
सध्या लग्न समारंभाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे हा सोहळा पार पाडण्यासाठी व लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी सरार्सपणे ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करू लागले आहेत. मात्र, या ड्रोन कॅमेऱ्यासाठी लागणारी परवानगी घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात विविध समारंभ, विवाह समारंभातही ड्रोन कॅमेऱ्यांचा सर्रास वापर होऊ लागला आहे. मोठ्या कार्यक्र मांच्या छायाचित्रीकरणासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात लग्न सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. परवानगी न घेताच या तंत्राचा वापर केला जात आहे. तालुक्यात वारेमाप पैसा उधळून शाही विवाह समारंभ पार पडतात. त्यामुळे विवाह समारंभात छायाचित्रीकरण करणारे छायाचित्रकार किंवा मंडप डेकोरेटर्स भाड्याने ड्रोन कॅमेरे आणतात. छायाचित्रकार २५ ते ३० मिनिटांच्या चित्रीकरणासाठी कॅमेऱ्याच्या भाड्यापोटी दहा ते वीस हजार रु पये मोजतात. ज्याच्याकडून कॅमेरा आणण्यात येतो, त्यांना पोलिसांची परवानगी मिळविणे गरजेचे आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने ज्या भागात छायाचित्रण केले जाणार आहे,त्याची माहिती पोलिसांना आधीच द्यावी लागते. त्यानंतर पोलिसांकडून परवानगी देण्यात येते. मात्र, असे असतानादेखील परवानगी घेतली जात नाही.
खासगी कार्यक्र म, चित्रपट, लग्न किंवा वाढदिवसाच्या समारंभासाठी ड्रोन कॅमेऱ्यातून छायाचित्रण करून घेण्याची मागणी वाढत आहे. लग्न समारंभ, वाढदिवसाचे लॉनवर होणारे भव्य कार्यक्र म, भलामोठा स्टेज आणि जमलेल्या पाहुण्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ काढण्याचा ट्रेंड आला आहे. खास क्षणांना वेगळ्या पद्धतीने टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरा भाडेतत्त्वावर घेऊन त्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी नागरिकप्रयत्नकरत आहेत.
विवाह समारंभात वापर
पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात विविध समारंभ, विवाह समारंभातही ड्रोन कॅमेऱ्यांचा सर्रास वापर होऊ लागला आहे. मोठ्या कार्यक्र मांच्या छायाचित्रीकरणासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते.
ड्रोन नावाचे यंत्र पाचशे फुटांपर्यंत उंच उडते आणि त्यावर बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने चांगल्या प्रतीची छायाचित्रे आणि व्हिडीओ काढता येतात. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोनच्या वापरावर पोलिसांनी बंदी घातली आहे. असे असले तरीदेखील पनवेलमध्ये सर्रासपणे ड्रोनकॅमेऱ्याचा वापर सुरू आहे.
संवेदनशील भागातील इमारती आणि संस्थांची सुरक्षितता ड्रोनच्या अनिर्बंध वापरामुळे धोक्यात आली होती. त्यामुळे पोलिसांची पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच ड्रोनचा वापर करू देण्याचे सूत्र पोलिसांनी स्वीकारले आहे.
असे असले तरीदेखील आकाशात भिरभिरणाऱ्या या कॅमेऱ्यांद्वारे टेहळणी केली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशाड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरावर निर्बंध घालावे.
ड्रोन कॅमेरे लावण्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. ड्रोन कॅ मेऱ्याचा विनापरवाना वापर करू नये. त्याची कायदेशीर परवानगी घ्यावी. विनापरवाना वापर केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे