शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पनवेलमध्ये विनापरवाना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर

By admin | Published: May 03, 2017 5:56 AM

सध्या लग्न समारंभाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे हा सोहळा पार पाडण्यासाठी व लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी सरार्सपणे ड्रोन कॅमेऱ्यांचा

मयूर तांबडे / पनवेलसध्या लग्न समारंभाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे हा सोहळा पार पाडण्यासाठी व लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी सरार्सपणे ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करू लागले आहेत. मात्र, या ड्रोन कॅमेऱ्यासाठी लागणारी परवानगी घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात विविध समारंभ, विवाह समारंभातही ड्रोन कॅमेऱ्यांचा सर्रास वापर होऊ लागला आहे. मोठ्या कार्यक्र मांच्या छायाचित्रीकरणासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात लग्न सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. परवानगी न घेताच या तंत्राचा वापर केला जात आहे. तालुक्यात वारेमाप पैसा उधळून शाही विवाह समारंभ पार पडतात. त्यामुळे विवाह समारंभात छायाचित्रीकरण करणारे छायाचित्रकार किंवा मंडप डेकोरेटर्स भाड्याने ड्रोन कॅमेरे आणतात. छायाचित्रकार २५ ते ३० मिनिटांच्या चित्रीकरणासाठी कॅमेऱ्याच्या भाड्यापोटी दहा ते वीस हजार रु पये मोजतात. ज्याच्याकडून कॅमेरा आणण्यात येतो, त्यांना पोलिसांची परवानगी मिळविणे गरजेचे आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने ज्या भागात छायाचित्रण केले जाणार आहे,त्याची माहिती पोलिसांना आधीच द्यावी लागते. त्यानंतर पोलिसांकडून परवानगी देण्यात येते. मात्र, असे असतानादेखील परवानगी घेतली जात नाही.खासगी कार्यक्र म, चित्रपट, लग्न किंवा वाढदिवसाच्या समारंभासाठी ड्रोन कॅमेऱ्यातून छायाचित्रण करून घेण्याची मागणी वाढत आहे. लग्न समारंभ, वाढदिवसाचे लॉनवर होणारे भव्य कार्यक्र म, भलामोठा स्टेज आणि जमलेल्या पाहुण्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ काढण्याचा ट्रेंड आला आहे. खास क्षणांना वेगळ्या पद्धतीने टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरा भाडेतत्त्वावर घेऊन त्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी नागरिकप्रयत्नकरत आहेत.विवाह समारंभात वापरपनवेल शहर तसेच ग्रामीण भागात विविध समारंभ, विवाह समारंभातही ड्रोन कॅमेऱ्यांचा सर्रास वापर होऊ लागला आहे. मोठ्या कार्यक्र मांच्या छायाचित्रीकरणासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते.ड्रोन नावाचे यंत्र पाचशे फुटांपर्यंत उंच उडते आणि त्यावर बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने चांगल्या प्रतीची छायाचित्रे आणि व्हिडीओ काढता येतात. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोनच्या वापरावर पोलिसांनी बंदी घातली आहे. असे असले तरीदेखील पनवेलमध्ये सर्रासपणे ड्रोनकॅमेऱ्याचा वापर सुरू आहे. संवेदनशील भागातील इमारती आणि संस्थांची सुरक्षितता ड्रोनच्या अनिर्बंध वापरामुळे धोक्यात आली होती. त्यामुळे पोलिसांची पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच ड्रोनचा वापर करू देण्याचे सूत्र पोलिसांनी स्वीकारले आहे. असे असले तरीदेखील आकाशात भिरभिरणाऱ्या या कॅमेऱ्यांद्वारे टेहळणी केली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशाड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरावर निर्बंध घालावे.ड्रोन कॅमेरे लावण्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. ड्रोन कॅ मेऱ्याचा विनापरवाना वापर करू नये. त्याची कायदेशीर परवानगी घ्यावी. विनापरवाना वापर केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे