शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शहरात ‘बोगस मतदाना’साठी अनधिकृत झोपड्यांना ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:06 AM

वर्षभरापूर्वी झाली मतदार नोंदणी : पदपथांवर वास्तव्य करणाऱ्यांकडेही शासकीय दस्तऐवज

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या वाढत असून, त्यामागे राजकीय स्वार्थ असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीत स्वतःचे पारडे जड करून घेण्यासाठी अनधिकृत झोपडीधारकांना शासकीय दस्तऐवज मिळवून दिले जात आहेत. त्यानुसार मागील दोन वर्षांत शहरात झोपड्या उभारून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार तयार करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी बोगस मतदारांची नोंदणी समोर येऊ लागली आहे. राजकीय व्यक्तींकडून बोगस मतदार नोंदणीसाठी अनधिकृत झोपड्यांमध्ये व पदपथांवर राहणाऱ्यांचा वापर केला जात आहे. तसे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी काही महिने अगोदर प्रभागातील मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांना आश्रय दिला जातो. त्यानंतर निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मतदार नोंदणीत त्यांचा मतदार म्हणून समावेश केला जात आहे. यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना शिधापत्रिका, आधार कार्डदेखील मिळवून दिले जात आहे. यावरूनच अनेकांची वर्षानुवर्षे राजकीय गणिते ठरत आहेत. तर अशा झोपडपट्ट्यांच्या आधारावरच अनेक जण स्वतःच्या गळ्यात विजयाची माळा पाडून घेत आहेत. परंतु राजकीय स्वार्थासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांमुळे ‘स्मार्ट सिटी’ऐवजी ‘झोपड्यांचे शहर’ अशी नवी मुंबईची ओळख होऊ लागली आहे. सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर, पालिकेच्या राखीव भूखंडावर तसेच राखीव कांदळवनात या झोपड्यांना थारा मिळत आहे. मात्र निवासाचा कसलाही पुरावा नसतानाही त्यांना आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका व मतदान ओळखपत्र मिळतेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून स्थानिक राजकारण्यांकडून संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत अर्थपूर्ण हितसंबंध जोपासत हेतू साध्य करून घेतला जात असल्याचे उघड दिसून येत आहे.

पामबीच मार्गावर वास्तव्य घणसोली येथे पामबीच मार्गाच्या प्रवेशावरच कांदळवनात झोपड्या बांधल्या आहेत. पूर्वी त्या ठिकाणी गॅरेज व नर्सरी चालवली जायची. मागील काही महिन्यांत तिथे निवासी वास्तव्य होऊ लागले आहे. तर त्यांची मतदानासाठी नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. 

लॉकडाऊनपूर्वी अनेकांची नोंदणीकोपर खैरणे येथील बालाजी थिएटरसमोर पदपथावर मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी अनेकदा कारवाई झाली आहे. परंतु गतवर्षी लॉकडाऊनपूर्वी तिथल्या शेकडो जणांची मतदार नोंदणी झाली आहे. यावरून संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रशासनाचे अपयशशहर अतिक्रमणमुक्त ठेवणे हे महापालिकेसह सिडको व एमआयडीसी यांचीदेखील जबाबदारी आहे. यानंतरही मोकळ्या भूखंडावर झोपड्या उभारल्या जात असताना त्यावर कारवाईकडे चालढकल केली जाते. तर अनेकदा कारवाईचा दिखावा करून दुसऱ्याच दिवशी पुन्हा झोपड्या उभारण्याची मुभा दिली जाते. यानंतरही अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVotingमतदान