अनधिकृत लॉजिंगला महापालिकेचे अभय
By admin | Published: November 13, 2016 01:42 AM2016-11-13T01:42:25+5:302016-11-13T01:42:25+5:30
अतिक्रमणाचा ठपका ठेवून महापालिकेने प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे, फेरीवाले, मार्जिनल स्पेस विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई
- नामदेव मोरे, नवी मुंबई
अतिक्रमणाचा ठपका ठेवून महापालिकेने प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे, फेरीवाले, मार्जिनल स्पेस विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई होत असताना दुसरीकडे तब्बल शहरात तब्बल ७३ अनधिकृत लॉजिंग- बोर्डिंग सुरू असून त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. अनधिकृतपणे व्यवसाय करून व सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून करोडो रुपये कमवणाऱ्यांवर कारवाई का नाही, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले असून गरिबाला बेघर करण्याअगोदर सर्वप्रथम अवैधपणे व्यवसाय करणाऱ्यांचे बांधकाम हटवण्याची मागणी केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने मे पासून अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे प्रथम स्वागत करण्यात आले होते; पण पाच महिन्यांच्या कार्यकाळात फक्त सामान्य नागरिकांवरच कारवाई झाली आहे. मोठ्या व्यापारी व उद्योगपतींवर ठोस कारवाई झालेलीच नाही. एपीएमसी, इनॉर्बिट व इतर अनेक कारवाई प्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पावसाळ्यात तीन महिने बंद असलेली कारवाई आता पुन्हा सुरू झाली आहे; पण या वेळीही दिशाहीनपणे मनात येईल तिथे कारवाई होत आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमध्ये शहरातील ८३ लॉजिंग-बोर्डिंग बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे २५ लॉजिंग व बोर्डिंग पूर्णपणे अनधिकृत आहेत. परवानगी न घेताच इमारती उभ्या करून त्यावर लॉजिंगचे व्यवसाय सुरू केले आहेत. २० लॉजिंग व बोर्डिंगसाठी बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्र घतलेले नाही. काही निवासी जागेवर तर काही ठिकाणी वाणिज्य, वेअर हाऊस, गोडावूनसह सर्विस इंडस्ट्रीसाठी राखीव असलेल्या जागेवर हॉटेल सुरू केलेली आहेत.
अतिक्रमणमुक्त नवी मुंबई मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे; पण पक्षपाती कारवाई व प्राधान्यक्रम निश्चित केलेला नसल्याने ही मोहीम पूर्णपणे फसली आहे. गरीब, कष्टकरी नागरिकांवर कारवाई होत असून धनदांडग्यांना अभय मिळत असल्याचे हॉटेलप्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. शहरातील अधिकृत दुकानदारांनी पावसापासून साहित्याचे नुकसान होऊ नये यासाठी उभारलेले वेदर शेडही पालिकेने हटवले; परंतु ज्यांनी पूर्ण बांधकामच अनधिकृत केले आहे.
निवासी जागेवर लॉजिंग सुरू केले आहे त्यांना मात्र अभय देण्यात येत आहे. पालिकेच्या दुटप्पी भूमिकेविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. कारवाई करण्यासाठी फक्त गरिबांच्या घरांनाच प्राधान्य का? असा प्रश्न रहिवाशांनी विचारला आहे. हॉटेलच्या परवानगीमागे अर्थकारण असल्याचा आरोप होऊ लागला असून स्थायी समितीमध्ये आवाज उठवल्यानंतरही प्रशासनाने अद्याप काहीही कारवाई केलेली नाही.
लॉजिंग-बोर्डिंगच्या अतिक्रमणाचे स्वरूप
- सर्विस इंडस्ट्रीसाठी राखीव भूखंडावर विनापरवाना लॉजिंग सुरू.
- टेरेस बंधिस्त करून त्या जागेचा लॉजिंगसाठी वापर.
- गोडावूनमध्ये पार्किंगसह अनधिकृत रूम तयार केल्या आहेत.
- वाहनतळाचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने रोडवर पार्किंग.
- वाणिज्य कार्यालयाच्या जागेवर लॉजिंगसाठी रूमची उभारणी.
- तळमजल्यावर दुकानांचे एकत्रीकरण करून लॉजिंगसाठी वापर.
- अनेक लॉजिंग-बोर्डिंगची नस्तीच उपलब्ध नाही.
परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र
नसलेली हॉटेल्स
हॉटेल विभाग
रघुनाथ गेस्ट हाऊस बेलापूर
हॉटेल न्यू मिनी महल नेरूळ
हॉटेल बलदेव पॅलेस नेरूळ
गेस्ट पॉर्इंट लॉजिंग शिरवणे
वाशी इन लॉजिंग वाशी
संकल्प लॉजिंग जुहूगाव
साईपरिक्रमा गेस्ट हाऊस जुहूगाव
हॉटेल शरण जुहूगाव
सपना लॉज जुहूगाव
दर्शना लॉजिंग जुहूगाव
अल्फा रेसिडेन्सी जुहूगाव
सागरकृपा गेस्ट हाऊस तुर्भे
हॉटेल रेक्स प्लाझा तुर्भे
हॉटेल सेल ईन लॉजिंग तुर्भे
कलश लॉजिंग तुर्भे
मॉर्डन गेस्ट हाऊस तुर्भे
अपोलो गेस्ट हाऊस तुर्भे
हॉटेल अपेक्स लॉज तुर्भे
हॉटेल नवी मुंबई तुर्भे
हॉटेल इंडियाना इन तुर्भे
राजेश हॉटेल्स अॅण्ड मोटेल्स ऐरोली
निवासी जागेवर सुरू
असलेली हॉटेल्स
कोहिनूर पॅलेस लॉजिंग शिरवणे
हॉटेल बलदेव पॅलेस शिरवणे
कोनार्क इन लॉज घणसोली
साईश्रद्धा हॉटेल घणसोली
कृष्णा अवतार स्टे इन दिवाळेगाव
वेअर हाऊसिंगच्या जागेवर
उभारण्यात आलेले हॉटेल्स
खालसा इंटरप्रायजेस तुर्भे
प्रिया गेस्ट हाऊस तुर्भे
हॉटेल यश्मिर लॉज तुर्भे
कुबेर हॉस्पिटॅलिटी तुर्भे
न्यू बॉम्बे व्यापार प्रा. लि. तुर्भे
साई साक्षी हॉटेल तुर्भे
हॉटेल कपल तुर्भे
सर्विस इंडस्ट्रीजच्या जागेवर लॉजिंग
गंगासागर रेस्टॉरंट अॅण्ड लॉजिंगनेरूळ
-सेक्टर १३
हॉटेल सिल्व्हर पॅलेस नेरूळ
शहरातील विनापरवाना हॉटेलची माहिती
हॉटेलविभाग
तारा हॉस्पिटॅलिटी सर्विसेसबेलापूर
कृष्णा अवतार स्टे इनबेलापूर
कोहीनूर पॅलेस लॉजिंग-बोर्डिंगनेरूळ
गेस्ट पॉर्इंट लॉजिंगनेरूळ
हॉटेल सनराईज लॉजिंग-बोर्डिंगनेरूळ
हॉटेल डायमंड पॅलेसशिरवणे
ऐश्वर्या लॉजिंग-बोर्डिंग नेरूळ
हॉटेल बलदेव पॅलेसशिरवणे
राजमहल रेस्टॉरंटशिरवणे
हॉटेल सिल्व्हर पॅलेस इनजुहूगाव
संकल्प लॉजिंगजुहूगाव
साईपरिक्रमा गेस्ट हाऊसजुहूगाव
हॉटेल शरणजुहूगाव
सपना लॉजजुहूगाव
दर्शना लॉजिंगजुहूगाव
अल्फा रेसिडेन्सी कोपरखैरणे
स्पायसेस रेस्टॉरंट लॉजकोपरखैरणे
कोनार्क इन लॉजघणसोली
साईश्रद्धा हॉटेलघणसोली
राजेश हॉटेल्स अॅण्ड मोटेल्सऐरोली
हॉटेल रॉयल पार्करामनगर, दिघा
हॉटेल इलाईट इनपावणे
ब्रह्मराज लॉजिंगरबाळे
मोनार्च लॉजिंगरबाळे
निवासी व वाणिज्य जागेवरील हॉटेल्स
हॉटेल न्यू मिनी महलशिरवणे
हॉटेल सनराईज लॉजिंग शिरवणे
हॉटेल डायमंड पॅलेस शिरवणे
ऐश्वर्या लॉजिंगनेरूळ
हॉटेल ब्लू डायमंडवाशी
हॉटेल जयप्रभाबेलापूर
हॉटेल अश्विथ बेलापूर
हॉटेल प्लाझा लॉजिंग हाऊस बेलापूर
हॉटेल सी व्ह्यूबेलापूर
के स्टार लाजिंग हाऊस बेलापूर
हॉटेल सी शोअर बेलापूर
पाम स्टार लॉजिंग अॅण्ड बोर्डिंगबेलापूर
मनिषा इंटरनॅशनलबेलापूर
महेश रेसिडेन्सी बेलापूर
तारा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस बेलापूर
वाशी इन लॉजिंगवाशी
रेक्स प्लाझा लॉजिंगतुर्भे
अपोलो गेस्ट हाऊस तुर्भे