पदपथावर अनधिकृत पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:06 AM2019-06-14T02:06:15+5:302019-06-14T02:06:43+5:30
नेरूळमधील प्रकार : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
नवी मुंबई : नेरुळमधील अनेक पदपथांवर वाहने बेकायदेशीरपणे पार्किंग केली जात आहेत त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावरून चालताना अपघात देखील होत आहेत. पदपथावर होणाºया बेकायदा वाहने पार्किंगकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी गैरसोय होत आहे.
नेरु ळ सेक्टर ४ मधील ग्रेट इस्टर्न गॅलरी या इमारतीमध्ये अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करणारे कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक इमारतीच्या बाहेरील पदपथावर उभी करीत आहेत. या इमारतीच्या बाहेरील रस्त्यावरून एनएमएमटी आणि बेस्ट बस, लहान- मोठी वाहने, स्कूल बस यांची मोठी वर्दळ असते. परिसरात असणाºया शाळांमध्ये अनेक विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक पायी चालताना या पदपथांचा वापर करतात; परंतु पदपथांवर आणि रस्त्याच्या कडेला वाहने उभी असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. वाहनांची वर्दळ असणाºया या रस्त्यावरून चालताना आजवर अनेक लहान-मोठे अपघात झाले असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाई करून नागरिकांसाठी पदपथ रिकामा करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.