शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

स्मार्ट सिटीतले वाहनचालक बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 2:08 AM

स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईस्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. तीन वर्षांत तब्बल १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे.नवी मुंबई शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सिडको व महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. परंतु भविष्यात सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईला ओळख मिळत असतानाच बेशिस्त वाहनचालकांमुळे त्याला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीच्या नियमांबाबत वारंवार जनजागृती करूनही शहरात बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढतच चालली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालवणाऱ्या अशा १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर मागील तीन वर्षांत कारवाई झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांची ही संख्या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या बरोबरीची आहे. तर त्यांच्याकडून १२ कोटी १५ लाख ३१ हजार ७०० रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात जमा झालेली आहे. वाहतूक पोलिसांनी परिमंडळ १ व २ मध्ये या कारवाया केल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे अशा विविध प्रकारांतून या कारवाया झालेल्या आहेत. मागील वर्षभरात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनालकांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. यासाठी नवी मुंबईसह पनवेल परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाया होत आहेत. सिग्नल तोडणे अथवा धूम स्टाईलने वाहन पळवल्याने सर्वाधिक अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना प्राणास मुकावे लागले असून, बहुतांश मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्याने झाले आहेत. त्यामुळे एकीकडे कारवाया करीत असताना दुसरीकडे जनजागृतीचाही उपक्रम वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी राबवलेला आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचे सर्वाधिक प्रमाण आहे. अशा रोडरोमीओंना देखील आवर घालण्यासाठी महाविद्यालय आवारात कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी ८५३ तरुणांवर वाहतुकीच्या विविध कलमांतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर उपक्रमाद्वारे तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला होता. त्यानंतरही स्मार्ट सिटीतल्या स्मार्ट नागरिकांमध्ये जनजागृती न झाल्याने सर्रास वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे.मद्यपान करून भरधाव वेगात वाहन चालवल्यामुळे घडणाऱ्या अपघातांचेही प्रमाण वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तळीराम वाहनचालकांवर गतवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. थर्टीफर्स्टच्या दिवशीही जागोजागी नाकाबंदी करून तळीराम चालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यानुसार २०१५ मध्ये १,८११ चालकांवर दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी कारवाया केल्या आहेत. पामबीच मार्गावर तसेच वाशीच्या मिनी सीशोअर व इतर मार्गावर धूम स्टाईलने मोटारसायकल पळवणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम पोलिसांनी राबवली. सन २०१५ मध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात अशा कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये १,३५८ जणांना वेगात वाहने चालवल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. असे असले तरीही आजही अनेक भागांत तरूणाईची धूम स्टाईल सुरूच असल्याचे पहावयास मिळते.