शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

खारघरमध्ये अघोषित पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:13 PM

जलवाहिनीत बिघाड; नागरिकांमधून संताप

पनवेल : सिडकोच्या मालकीच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत बिघाड झाल्याने खारघर शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून खंडित झाला आहे. तीन दिवस उलटूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.खारघरसह उलवे, द्रोणागिरी नोडमध्ये हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे मुलांच्या शाळा सुरू झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग सुरू असताना अघोषित पाणीबाणी निर्माण झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे शहरात पाणी समस्या उद्भवली असताना टँकरमाफिया जोरात आहेत. त्यामुळे नागरिकांना चढ्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. यासंदर्भात प्रभाग अ चे सभापती शत्रुघ्न काकडे यांना माहिती मिळताच त्यांनी काम सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी हेटवणे धरण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश हातवार हे देखील उपस्थित होते. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. सध्याच्या घडीला जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई