‘स्त्री’ला समजून घ्या - महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:39 AM2017-12-26T05:39:45+5:302017-12-26T05:39:56+5:30
पनवेल : स्त्री मुळात बुद्धिमान असते, तिला समजून घ्या, वेळ द्या मग ती कशी काम करते याचा अनुभव तुम्हाला येईल, असे प्रतिपादन पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या दुस-या दिवशी महिला सत्राचे उद्घाटन करताना केले.
पनवेल : स्त्री मुळात बुद्धिमान असते, तिला समजून घ्या, वेळ द्या मग ती कशी काम करते याचा अनुभव तुम्हाला येईल, असे प्रतिपादन पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या दुस-या दिवशी महिला सत्राचे उद्घाटन करताना केले. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे ८वे त्रैवार्षिक अधिवेशन पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयात सुरू आहे. आजच्या दुसºया दिवशी महिला सत्र सुमेधा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या वेळी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका मुग्धा लोंढे, राजश्री वावेकर, स्मिता गोखले, शर्मिला पाटील सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षा सुमेधा वैद्य यांनी महिलांनी पुढे या, कार्यरत व्हा, जिद्द बाळगून काम करा, असे सांगितले.