शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षाखेरीस गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 2:49 AM

८ कोटी ११ लाख खर्च : यंदाचा प्रजासत्ताक दिन गणवेशाविना

नवी मुंबई : महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करण्याच्या रखडलेल्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. प्रजासत्ताक दिनही गणवेशाविनाच साजरा होणार असून, शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस गणवेशाचे वाटप होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत ३० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन वर्षे शैक्षणिक साहित्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना गणवेश व इतर साहित्यापासून वंचित राहावे लागले होते. यामुळे यावर्षी शासनाच्या मंजुरीनंतर गणवेश, पीटी व स्काउट गाइड गणवेश महापालिकेने खरेदी करून देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या विषयी निविदा काढून डिसेंबरमध्ये हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला होता. आठ कोटी ११ लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येणार आहे. दोन आठवडे हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतले होते. तिसऱ्यांदा हा प्रस्ताव सादर केल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे देवीदास हांडे-पाटील यांनी याला आक्षेप घेतले. ठेकेदार कंपनीने पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी साध्या लेटरवर दिली आहे. या कंपनीला शैक्षणिक साहित्य पुरविण्याचा कोणताही अनुभव नाही. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती.अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तर दिले. ठेकेदाराने खोटी कागदपत्रे सादर केली असल्यास व ते निदर्शनास आल्यास आपणास त्याच्यावर कारवाई करता येते. या कामाविषयी घेतलेल्या आक्षेपांविषयी आयुक्त रामास्वामी एन. यांनी संबंधित कंपनीशी चर्चा केली आहे. या प्रस्तावाच्या योग्यतेविषयी खात्री पटल्यानंतरच तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.स्थायी समिती वेठीस धरू नकाराष्ट्रवादी काँगे्रसने सलग तिसºया बैठकीमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीच्या प्रस्तावावर आक्षेप घेतले होते. सभेमध्ये चर्चेचे गुराळ वाढू लागल्यामुळे शिवसेनेच्या द्वारकानाथ भोईर यांनी आक्षेप घेतले. विनाकारण स्थायी समिती वेठीस धरण्याचे काम केले जाऊ नये, अशी भूमिका मांडली. अखेर सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई