नेरळमधील युनियन बँकेचे व्यवहार ठप्प; पेन्शनर, खातेदार संतप्त; उपाययोजना करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:02 AM2019-12-09T00:02:03+5:302019-12-09T00:02:33+5:30

नेरळ गावातील सर्वात जुनी बँक असलेल्या युनियन बँकेचा कारभार पुन्हा एकदा ठप्प झाला आहे.

Union Bank transaction in Neral jammed; Pensioner, accountant aggrieved; Demand for remedy | नेरळमधील युनियन बँकेचे व्यवहार ठप्प; पेन्शनर, खातेदार संतप्त; उपाययोजना करण्याची मागणी

नेरळमधील युनियन बँकेचे व्यवहार ठप्प; पेन्शनर, खातेदार संतप्त; उपाययोजना करण्याची मागणी

Next

नेरळ : नेरळ गावातील सर्वात जुनी बँक असलेल्या युनियन बँकेचा कारभार पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. येथील इंटरनेट सेवा ही गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याने नेरळमधील बँकेचे खातेदार आणि पेन्शनर संतापले आहेत.

नेरळमधील युनियन बँक ही येथील पहिली बँक असल्याने त्या शाखेत तब्बल ३० हजार खातेदार आहेत. त्या खात्यांपैकी दहा हजारांहून अधिक खाती ही करंट खाती असून, नेरळमधील सर्व व्यापाºयांची खाती नेरळमधील एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. मात्र, या बँकेत सातत्याने इंटरनेट सेवा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नेरळमध्ये आलेल्या अन्य बँकेकडे खातेदार वळले आहेत. त्यात युनियन बँकेच्या शाखेत सरकारी कर्मचारी असलेले पेन्शनर हे महिन्याच्या पहिल्या तारखेला एकत्र येत असतात.

मात्र, या वेळी दहा दिवसांपासून बँकेची इंटरनेट सेवा बंद असल्याने ५ डिसेंबरपर्यंत सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे साधारण १ तारखेपासून पेन्शनवर अवलंबून असलेल्या वयोवृद्ध पेन्शनरची बँकेबाहेर गर्दी दाटत आहे. बँकेच्या या आउट आॅफ कव्हरेज नेटवर्कचा या ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसत आहे. तासन्तास बँकेबाहेर ताटकळूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने त्यांची मोठी फरफट होत आहे.

बँकेला इंटरनेट सेवा देणाºया बीएसएनएलकडून इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने सातत्याने बँकेचे व्यवहार बंद पडत आहेत. ही बाब सातत्याने निर्माण होत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. युनियन बँकेच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयाने नवीन इंटरनेट सेवा घेण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली आहे. मात्र, ही यंत्रणा अजून कार्यान्वित झाली नसल्याने बीएसएनएलवरच बँक अवलंबून आहे. त्यामुळे बँकेतील खातेदार, पेन्शनर, ग्राहक वैतागले असून, बँकेच्या आउट आॅफ कव्हरेज कामाविषयी संताप व्यक्त केला जात आहे. लवकर उपाययोजना करून व्यवहार सुरू करण्याची मागणी होत आहे.

रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने रस्ता खोदला त्यात बीएसएनएलच्या वाहिन्या तुटल्या आहेत. असे बीएसएनएलने सांगितले आहे. त्यामुळे केवळ आमच्याकडेच नाही तर सगळीकडे इंटरनेट बंद आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. मात्र, बँकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प नसून ग्राहकांना थोडेथोडे करून पैसे दिले जात आहेत. सोमवारपर्यंत इंटरनेट सेवा सुरळीत होऊन बँकेचे कामकाज व्यवस्थित होईल.
- अदिती म्हात्रे, व्यवस्थापक

युनियन बँक ही नेरळमधील पहिली राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यामुळे पूर्वीपासून या बँकेत आम्ही खातेदार आहोत. मात्र, आजच्या डिजिटल युगात बँकेतील इंटरनेट कायम गुल असते. त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे कायम घडत असते. सोमवारपर्यंत जर बँकेचे कामकाज सुरळीत झाले नाही, तर आम्ही या बँकेस टाळे ठोकू.
- अरविंद कटारिया,

नेरळ व्यापारी फेडरेशन

गेले काही दिवस मी नेरळमधील युनियन बँकेत फेºया मारतोय. मात्र, बँकेचे नेट नसल्याने बँकेतील माझे काम होत नाही. मी व्यावसायिक असल्याने सारखे बाहेर येणे-जाणे असते. मात्र, बँकेत वेळ जास्त जात असल्याने इतर कामांची पुरती वाट लागते. अनेक वृद्ध पेन्शनर बँकेबाहेर आपली पेन्शन घेण्यासाठी सकाळपासून येऊन बसतात. ऊन, थंडी कशाचीही तमा न बाळगता उपाशी तापाशी ते बँकेबाहेर बसत असल्याचे पाहून मन हेलावले. बँकेमध्ये विचारणा केली की विनाकारण वादावादी होते. नेरळमधील युनियन बँक म्हणजे डोकेदुखी झाली आहे.
- विनायक क्षीरसागर, खातेदार

Web Title: Union Bank transaction in Neral jammed; Pensioner, accountant aggrieved; Demand for remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.