केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा पनवेलमध्ये सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:44 AM2018-11-06T04:44:34+5:302018-11-06T04:44:49+5:30

उत्तर भारतीय समाजातर्फे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात रविवार नागरी सत्कार करण्यात आला.

 Union Minister of State, Anupriya Patel, honored in Panvel | केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा पनवेलमध्ये सत्कार

केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा पनवेलमध्ये सत्कार

Next

पनवेल - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हिंदी भाषिक विविध राज्यांतून येऊन कष्ट करीत उद्योगधंदे मजबूत करतात. त्यांनी आपल्या राज्यातील नातेसंबंध दृढ करावेत. तेथील नातेवाइकांशी संबंध ठेवून त्यांना प्रेरणा द्यावी, असे उद्गार यावेळी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी काढले.
उत्तर भारतीय समाजातर्फे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात रविवार नागरी सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पटेल यांच्या खात्याने गोरगरिबांना आरोग्या सुविधा पुरवण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ अनेकांना होत असल्याचा आपल्याला दिसत आहे. गरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.
यावेळी अनुप्रिया पटेल सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, मोदी सरकारने देशातील गरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देशात पाच लाख गोल्ड कार्ड आतापर्यंत दिली आहेत. त्यामुळे ५५ कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गरीब माणसाच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती पटेल यांनी देऊन प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय आरोग्य धोरण तयार केल्याचे सांगितले.
समारंभास उत्तर प्रदेशचे आमदार आशिष पटेल, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्र ांत पाटील, भाजपाचे अमरजीत मिश्रा, डॉ. सुभाष सिंह, संतोष सिंह, बाबूलाल पटेल, सी. पी. प्रजापती, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा बिना गोगरी आदी उपस्थित होते.

Web Title:  Union Minister of State, Anupriya Patel, honored in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.