पर्यावरण संवर्धनाकरिता अनोखा उपक्रम
By admin | Published: May 23, 2017 02:07 AM2017-05-23T02:07:09+5:302017-05-23T02:07:09+5:30
सीबीडी सेक्टर ८ परिसरातील आर्टिस्ट कॉलनीतील तरुणाने पर्यावरण संवर्धनाकरिता पुढाकार घेत पावसाळ््यात एक तरी झाड नक्कीच लावू या हा उपक्रम राबविला आहे.
प्राची सोनवणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ परिसरातील आर्टिस्ट कॉलनीतील तरुणाने पर्यावरण संवर्धनाकरिता पुढाकार घेत पावसाळ््यात एक तरी झाड नक्कीच लावू या हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातंर्गत बियांचे गोळे तयार केले जाणार असून पावसाळ््यात भ्रमंतीसाठी जाताना हे गोळे विविध भागांमध्ये पेरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये जांभूळ, करंज, सोनमोहर, बाभुळ, गुलमोहर, सफेद सावरा आदी बियांचा समावेश आहे.
सीबीडीतील आर्टिस्ट कॉलनी येथे राहणाऱ्या योगेश चव्हाण या तरुणाने ही संकल्पना सर्वांसमोर आणली असून निसर्गप्रेमींच्या पुढाकाराने २००० बियांचे गोळे तयार केले जात आहेत. नुकतेच ५०० गोळे तयार झाल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील झाडांचे प्रमाण कमी होत आहे. प्राणवायू देणाऱ्या वृक्षसंपत्तीच्या रक्षणाकरिता एखादे ठोस पाऊल उचलण्याचे ठरवत ही संकल्पना पुढे आणल्याचेही चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पावसाळ््यामध्ये भटकंती करायला जाताना मात्र प्रत्येकाने एक तरी गोळ सोबत न्यावा आणि तो गोळ््या हव्या त्या ठिकाणी टाकावा पुढील काम निसर्ग स्वत:च करेल असे या निसर्गप्रेमींनी सांगितले. गड, किल्ले, ट्रेकिंग असो वा पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल अशा ठिकाणी हे गोळे सोबत नेल्यास त्याठिकाणी प्रत्येकी एक झाड लावण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकतो. याकरिता फारसा खर्चही लागत नसून पर्यावरण संवर्धनासाठी मात्र मोलाचा हातभार लागतो.
तयार झालेले हे २०० हजार गोळे कोणी, कुठे आणि किती ठिकाणी टाकलेत यांचे फोटो, ठिकाणाचे नाव, माहिती याची नोेंद देखील या उपक्रमांतर्गत घेतली जाणार असल्याची माहिती निसर्गप्रेमी योगेश चव्हाण यांनी दिली. या तरुणाने आतापर्यंत परिसरामध्ये वन्यजीव संरक्षण, वृक्षसंपत्ती जतन करण्याकरिता अनेक उपक्रम हाती घेतले असून पर्यावरण संवर्धनाकरिता परिसरात जनजागृती करण्याचे काम देखील होती घेतले आहे.
शहरातील निसर्गप्रेमींनी पुढाकार घेत अशा प्रकारचा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.