चिमुरड्यांची वीर जवानांना अनोखी सलामी
By admin | Published: January 9, 2017 06:25 AM2017-01-09T06:25:59+5:302017-01-09T06:25:59+5:30
पाकिस्तानव्याप्त काश्मीर प्रांतातील दहशतवादी हल्ल्याला सडतोड प्रत्त्यतर म्हणून भारतीय जवानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून
पेण : पाकिस्तानव्याप्त काश्मीर प्रांतातील दहशतवादी हल्ल्याला सडतोड प्रत्त्यतर म्हणून भारतीय जवानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ४० अतिरेक्यांचा केलेला खात्मा. त्या भारतीय कमांडोजची ही शौर्यगाथा संपूर्ण भारतीय नागरिकांना प्रेरणा देणारी ठरली. सैनिकांचे अभिनंदन व मनोबल वाढविण्यासाठी संपूर्ण देशभरात चढाओढ सुरू झाली. ‘इट का जबाब पत्थर से’ या अनुषंगाने भारतीय सैनिकांची शौर्यगाथा शालेय जगतातसुद्धा उमटली. पेण महिला शिक्षण संचलित शिशू विकास मंदिरच्या विविध गुणदर्शन वार्षिक कार्यक्रमामध्ये इंडियावाले... दुश्मन के छक्के छुडायेंगे या गीतांवरील समूहनृत्य अविष्कारातून सर्जिकल स्ट्राईकचा धमाकेदार परफॉमस शिशू विकासच्या लिटल चॅम्पसनी सादर के ला.प्रारंभीचे कार्यक्रम उंचीवर नेऊन ठेवल्याने रसिक प्रेक्षकांची उत्कं ठा शिगेला पोहोचल्याचे दिसून आले.
शालेय शिक्षणापासून राष्ट्रभक्तीचे धडे मूल्यशिक्षणातून मिळतात. मात्र, ठरावीक प्रसंगी अशा काही लक्षणीय घटना घडतात. त्याचे पडसाद समाजात व शिक्षण जगतात उमटतात. डिजिटल क्रांतीने तर काही दृकश्राव्य स्वरूपात पाहावयास मिळते. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईकचा केलेला पराक्रम छोट्या बालकांनी विविध न्यूज चॅनेल्सवर पाहिला. सोशल मीडियातही याची बरीच चर्चा झाली, अशा घटनांची दखल शिक्षक व पालकांनी घेतली आणि स्नेहसंमेलनातही या विरांना अनोखी सलामी या चिमुरड्यांनी दिली. या वेळी ‘मला गं बाई जाग आली’ (पारंपरिक गीत) ‘शेपटीवाल्या प्राण्यांची...’ (बडबड गीत) ‘नाच रे मोरा’, ‘झुक झुक गाडी’ (बालगीत) ‘पर्यावरण संवर्धन’ (नाटिका), ‘वृद्धाश्रम’ (नाटिका) कार्टून साँग, शेतकरी गीत, फॅशन शोमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि गुरू-शिष्य परंपरेवर ‘गुरुपौर्णिमा’ हे नाटक, अशा रंगतदार कार्यक्रमात छोट्या शिशूंनी नृत्य, नाटक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, सर्व पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक अशी मोठी गर्दी जमली होती. (वार्ताहर)