विद्यार्थ्यांकडून शहिदांना अनोखी श्रद्धांजली, 26/11 ची मानवी साखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 09:22 PM2019-11-26T21:22:21+5:302019-11-26T21:25:39+5:30
महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी ,फॅशन डिझायनिंग
नवी मुंबई - पनवेलमध्ये शहिदांना विद्यार्थ्यांकडून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मानवी साखळीद्वारे 26/11 ची प्रतिकृती पनवेलमध्ये पाहायला मिळाली. मुंबईतील 26/11 च्या दुर्दैवी घटनेला 11 वर्ष पूर्ण झाली. देशाच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या वीर-जवानांना देशभरात या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते. पनवेलमधील पिल्लई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये 26/11 ची प्रतिकृती मानवी साखळीद्वारे टायर करून शाहिदाना श्रद्धांजली वाहिली.
महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी ,फॅशन डिझायनिंग आदींसह विविध शाखेतील शेकडो विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात एकत्र येऊन 26/11 ची मानवी साखळीद्वारे प्रतिकृती उभारून श्रद्धांजली वाहिली. देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या वीर जवानांप्रती सदभावना व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन स्वयंप्रेरनेने विद्यार्थ्यांनी आयोजत केले असल्याची माहिती पिल्लई महाविद्यालयाच्या डॉ. निवेदिता श्रेयन्स यांनी दिली. दरवर्षी विविध उपक्रम राबवून शहीदाना श्रद्धांजली वाहिली जात असल्याचे श्रेयन्स यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.