उरणमधील द्रोणागिरी परिसरातील अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:09 AM2019-07-18T00:09:27+5:302019-07-18T00:09:35+5:30
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्रोणागिरी नोड परिसरातील जेएनपीटी वसाहत ते बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत टप-या व चायनीजच्या दुकानावर बुधवारी कारवाईचा बडगा उगारला.
उरण : सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्रोणागिरी नोड परिसरातील जेएनपीटी वसाहत ते बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत टप-या व चायनीजच्या दुकानावर बुधवारी कारवाईचा बडगा उगारला.
उरण नवघर, पागोटे ग्रामपंचायत हद्दीत द्रोणागिरी नोड परिसरातील जेएनपीटी वसाहत बस स्थानक ते बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याजवळ टपºया, चायनीजची दुकाने उभारली आहेत. या टपºयांवर, चिकन दुकान व चायनीजच्या दुकानावर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी मोठ्या पोलीस फाट्यासह कारवाई के ली. सिडकोच्या धडाकेबाज कारवाईमुळे मात्र येथील टपरीधारक, चायनीजधारकांचं उदरनिवार्हाचं साधनच मातीमोल झाले आहे. सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाºयांनी परप्रांतीयांनी थाटलेल्या द्रोणागिरी नोड परिसरातील भंगार व्यावसायिकांवर कारवाई न करता स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांनी थाटलेल्या व्यवसायावर सिडकोची कारवाई का, असा प्रश्न उपस्थित करून अतिक्रमण विभागाने कारवाई थांबवावी, अशी विनंती केली.
हे टपरीधारक चायनीजधारक व इतर व्यावसायिकांनी सिडकोच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी दोन वर्षांपासून नोटीस बजावल्या होत्या, परंतु या व्यावसायिकांनी सिडकोच्या जागेवरील अतिक्रमण हटविले नाही. उलट रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमणावर कारवाई सुरू केली आहे असे सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.