नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या साईटवर दिबांच्या नावाच्या फलकाचे अनावरण
By वैभव गायकर | Published: June 24, 2023 04:31 PM2023-06-24T16:31:10+5:302023-06-24T16:35:47+5:30
शासनाला जाग आणन्यासाठी आम्ही हे प्रातिनिधिक स्वरूपाचे फलक याठिकाणी लावले असल्याचे ऍडव्होकेट विक्रांत घरत यांनी सांगितले.
पनवेल:नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा विषय पनवेलसह नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. दिबांच्या नावासाठी आंदोलने, मोर्चे निघाले त्यानंतर राज्य सरकारने त्यांचा नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठीच ठराव मंजुर केला मात्र या ठरावाचे पुढे काय झाले नसल्याने आज दि.24 रोजी दिबांच्या स्मृतिदिनानिमित्त विमातळाच्या साईटवर लोकनेते दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमनतळाच्या फलकाचे नव्याने अनावरण केले.
शासनाला जाग आणन्यासाठी आम्ही हे प्रातिनिधिक स्वरूपाचे फलक याठिकाणी लावले असल्याचे ऍडव्होकेट विक्रांत घरत यांनी सांगितले. 27 गाव प्रकल्प ग्रस्त समिती आणि नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्त यावेळी उपस्थित होते.यावेळी प्रकल्पग्रस्तांनी भर पावसात रॅलीचे आयोजन केले होते.दिबा पाटील अमर रहे ...अशा स्वरूपाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.एकीकडे राज्य शासन विमानतळाचा ठराव करून मोकळे झाले आहे.मात्र या ठरावाचे पुढे काय झाले ? असा संतप्त सवाल प्रकल्पग्रस्त विचारू लागले आहे. दोन वर्ष उलटले असताना देखील दिबांच्या नामकरणाचा विषय कुठेतरी मागे पडला कि काय ? असा प्रश्न नवी मुंबई मधील प्रकल्प नेते मनोहर पाटील यांनी उपस्थित केला.
दरम्यान दिबांच्या स्मृतिदिनानिमित्त दिबांना मानवंदना वाहण्यासाठी सकाळपासून पनवेल शहरातील त्यांच्या संग्राम निवासस्थानी सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त नेते,प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकीकडे विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु असताना दिबांच्या नावाबाबत केंद्रात अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. दिबांचे नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे याकरिता प्रथमच रायगड,ठाणे,पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त एकवटले होते.