उरण, जेएनपीटीतील एमटीएनएलला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:00 AM2018-12-17T03:00:32+5:302018-12-17T03:00:49+5:30

ग्राहकांची संख्या घटली : अपुऱ्या मनुष्यबळाचाही परिणाम

Uran, JNPT home to MTNL | उरण, जेएनपीटीतील एमटीएनएलला घरघर

उरण, जेएनपीटीतील एमटीएनएलला घरघर

Next

उरण : उरण परिसरात ग्राहकांना दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरविण्यास महानगर टेलिफोन निगम असमर्थ ठरली आहे. त्यामुळे उरण-जेएनपीटी परिसरात पैसे भरूनही समाधानकारक सोयी-सुविधा मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यांनी एमटीएनएलची सेवा खंडित करून खासगी, केबल नेटच्या कनेक्शनला अधिक पसंती दिली आहे.

उरण-जेएनपीटी परिसरातील एमटीएनएलच्या ग्राहकांची संख्या साडेदहा हजारांवरून २७०० पर्यंत इतकी घटली आहे. दोन्ही एक्सचेंजमधील उरलेल्या २७00 ग्राहकांनाही आता एमटीएनएल दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरविण्यातही अपयशी ठरू लागल्याने परिसरातील एमटीएनएल विभागच बंद होण्याच्या मार्गावर आहे. कर्मचाºयांअभावी या विभागाला अखेरची घरघर लागल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे.

सध्याच्या आधुनिक, गतिमान युगात इंटरनेट सेवा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. मात्र उरण-जेएनपीटी परिसरात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरविणारी एमटीएनएल मात्र पूर्णत: अपयशी ठरली आहे. त्यामुळे परिसरातील व्यापारी, नागरिक आणि विविध शासकीय कार्यालये व बँका आदी हजारो ग्राहकांवर एमटीएनएलच्या निकृष्ट सेवेचा फटका बसला आहे.

खंडित सेवेमुळे ग्राहक हैराण
च्वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने आणि तत्काळ पूर्ववत होण्याची कोणतीही खात्री नसल्याने हजारो ग्राहकांनी एमटीएनएलच्या सेवेला रामराम ठोकून खासगी कंपन्यांचा आधार घेण्यात सुरुवात केली आहे.
च्परिणामी एमटीएनएलच्या उरण-जेएनपीटी परिसरातील ग्राहक संख्या दहा हजारांवरून केवळ २७०० पर्यंत इतकी घसरली आहे.

उरण एक्स्चेंजमध्येही सध्या कार्यरत असलेल्या १५०० ग्राहकांसाठी सध्या १८ कर्मचारी कार्यरत आहेत. अपुºया मनुष्यबळामुळे एक्स्चेंजच्या कामावर परिणाम होत आहे.
- प्रमोद बळकुटे, डीएम, उरण एक्स्चेंज

उरण तालुक्यात जेएनपीटी आणि उरण असे दोन टेलिफोन एक्स्चेंज आहेत. देशातील सर्वात मोठ्या असलेल्या जेएनपीटी बंदरातून सर्वाधिक कंटेनर हाताळणी केली जाते. मात्र यासाठी जेएनपीटी टेलिफोन एक्स्चेंजमध्ये १२०० ग्राहकांसाठी फक्त ९ कामगारच उरले आहेत. अपुºया कर्मचाºयांमुळे ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. - विजय गुप्ता, डीएम, जेएनपीटी विभाग

Web Title: Uran, JNPT home to MTNL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.