पैहलवानांच्या समर्थनासाठी उरणच्या काँग्रेसच्या रणरागिणी दिल्लीत; मोदी सरकारचा केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 03:55 PM2023-06-06T15:55:53+5:302023-06-06T15:56:12+5:30

पैलवानांच्या समर्थनार्थ सोमवारी ( ५) मंत्रालया समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Uran's Congress campaigners in Delhi to support wrestlers; Modi government protested | पैहलवानांच्या समर्थनासाठी उरणच्या काँग्रेसच्या रणरागिणी दिल्लीत; मोदी सरकारचा केला निषेध

पैहलवानांच्या समर्थनासाठी उरणच्या काँग्रेसच्या रणरागिणी दिल्लीत; मोदी सरकारचा केला निषेध

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वा लाखे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या महिला पैलवानांच्या समर्थनार्थ सोमवारी ( ५) मंत्रालया समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा एक भाग म्हणून उरण तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा  रेखा मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली उरणच्या रणरागिणीनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवित महिला पैलवानांच्या समर्थनार्थ आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

    रायगड जिल्हा प्रभारी  अनिता ताई प्रजापती व जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत तसेच रायगड महिला जिल्हाध्यक्षा  श्रध्दा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पैलवानांच्या समर्थनार्थ आंदोलनास दर्शविण्यात आलेल्या जाहीर पाठिंबा प्रसंगी उरण तालुक्यातून काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षा रेखा मनोज घरत,भारती दिपक कांबळे,विनया पाटील, कल्पना ठाकूर,कमळाताई पाटील, निर्मला दिपक पाटील, ऐश्वर्या राजेंद्र शिवकर,अब्रीन इस्लाम मुखरी, यशोदा दिपक पाटील सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

यावेळी काँग्रेस पक्षाच्या उरण तालुका अध्यक्षा  रेखा  घरत यांनी सांगितले की आज देशातील महिला सुरक्षित राहीली नाही.ज्या महिला परदेशात देशाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्या पैलवान महिलांना आपल्या न्याय हक्कासाठी केंद्र सरकार समोर झगडावे लागत आहे.ही खरी शोकांतिका आहे.अशा मोदी सरकारचा उरणमधील महिला निषेध व्यक्त करत आहेत.

Web Title: Uran's Congress campaigners in Delhi to support wrestlers; Modi government protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.