शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

पनवेलमध्ये रस्त्यांचा पार्किंगसाठी वापर ; वाहनतळासाठी पुरेशी सुविधा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 2:51 AM

पनवेल शहरातील रस्ते अतिशय लहान आहेत.

कळंबोली : पनवेल महानगरपालिका हद्दीत आणि सिडको कॉलनीत बिल्डिंगमध्ये वाहने उभे राहण्याकरिता पुरेशी जागा नाही. त्यामुळे रस्त्यावरच ते उभे केले जातात. त्यामध्ये चारचाकी वाहनांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे वाहतूककोंडी आणि अपघाताची खूप दाट शक्यता तयार होते. याला सिडकोच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीकरिता आहेत की वाहने उभे करण्यासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पनवेल शहरातील रस्ते अतिशय लहान आहेत. तसेच येथे बांधण्यात आलेल्या ज्या बिल्डिंग आहेत, त्यामध्ये काही ठिकाणी पार्किंगच नाही. एकदम ग्राउंडलाही घरे आहेत. त्यामुळे येथील रहिवासी रस्त्यावर टू व्हीलर आणि फोर व्हीलर उभे करतात. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर, या कॉलनीत अनेक इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. येथेही अनेक इमारतीमध्ये वाहने उभी करण्याकरिता जागा नाही. या विषयांवरून सोसायटीतील रहिवाशांची भांडणे लागतात. त्यामुळे येथे शांतता राहत नाही आणि कायम धूसफूस सुरू राहते. खारघर कॉलनीत ही समस्या अधिक मोठी जाणवते.या परिसरात वास्तव्य करणाऱ्या अनेकांकडे दोन-तीन वाहने आहेत. म्हणून पार्किंगची जागा व वाहनांची संख्या यामध्ये गणित बसत नाही. याच कारणाने अनेक वाहने रस्त्यावर उभी केली जातात. काही सोसायट्यांमध्ये बाहेरच्या वाहनांना येऊ दिले जात नसल्याने तेही रस्त्याच्या बाजूला उभे करून इमारतीत जातात.कामोठ्यात पार्किंगविषयी अनेक तक्र ारी पोलीस स्टेशनला येतात. रहिवाशांमध्ये वाद होत आहेत. पार्किंगविषयीची भांडणे सोडविण्याकरिता पोलिसांचा वेळ जातो. या इमारतीत एकूण किती फ्लॅट आहेत, त्यानुसार वाहने लावण्याकरिता पुरेशी पार्किंग बिल्डरने सोडली का? या गोष्टी तपासून सिडकोने सीसी व ओसी द्यायला पाहिजे होती; परंतु याकडे ध्यान दिलेच नाही. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.सार्वजनिक पार्किंगची सोय करावीनवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर या सर्वच ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सोय नाही. त्यासाठी सिडकोने भूखंड ठेवला नाही. मात्र, पुढील काळात विचार करून महानगरपालिकेने सर्वच कॉलनीमध्ये पार्किंगकरिता भूखंड सिडकोकडून घ्यावा ही त्यांची जबाबदारी आहे, असा विषय प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी मांडला आहे. सिडकोकडून अशी जागा मिळाली, तर तिथे सार्वजनिक वाहनतळ निर्माण करता येईल आणि तिथे वाहने उभी करता येतील, असे भोपी यांनी सांगितले.आमच्या वाहतूक शाखेत तीन कॉलनी आहेत. तिथे वाहतूककोंडी होते. त्यातील एक कारण आहे, ते म्हणजे रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने आहेत. म्हणून आम्ही सिडकोकडे याविषयी पत्रव्यवहार केला आहे. वाहने उभी करण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्यांच्याकडूनही सहकार्याची भूमिका घेतली जात आहे.- अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कळंबोली वाहतूक शाखामहापालिका हद्दीत वाहने रस्त्यावर उभी केली जातात. ही वस्तुस्थिती आहे तशा तक्र ारी येतात. मात्र, सिडकोने आमच्याकडे रस्ते आणि भूखंड वर्ग केलेले नाहीत. त्यानंतरही सार्वजनिक वाहनतळाबाबत महापालिका धोरण ठरवू शकते.- संजय कटेकर, नगर अभियंता,पनवेल महापालिका

टॅग्स :Parkingपार्किंग