कंत्राटी कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्राचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:37 AM2018-08-25T01:37:45+5:302018-08-25T01:38:03+5:30

महानगरपालिकेच्या ५७०० कंत्राटी कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फेंसिंग व ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Use of techniques to monitor contract workers | कंत्राटी कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्राचा वापर

कंत्राटी कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्राचा वापर

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ५७०० कंत्राटी कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फेंसिंग व ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ११ कोटी ५१ लाख रूपये खर्चाच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली असून कामगारांच्या मनगटावर आधुनिक यंत्र बांधण्यात येणार आहे.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, शिक्षण, क्रीडा, विष्णुदास भावे, मालमत्ता विभाग, कार्यकारी अभियंता मोरबे, पाणीपुरवठा, मलनि:सारण, विद्युत विभागामध्ये ५७०० कंत्राटी कामगार काम करत आहेत. कामगार नेमून दिलेल्या ठिकाणी ८ तास काम करत आहेत का,कामावर वेळेत येत आहेत का याविषयी लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने यापूर्वी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. परंतु यानंतरही बोगस कामगार व कामचुकार कामगारांवर नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही. यामुळे जिओ फेसिंग व ट्रॅकिंग प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नागपूरमध्ये या तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
कामगारांच्या मनगटावर हे अत्याधुनिक घड्याळ बसविण्यात येणार आहे. यामुळे कामगार किती वाजता कामावर आला, निर्धारित वेळेत काम केले का नाही हे समजणार आहे. यासाठी ११ कोटी ५१ लाख रूपये खर्च होणार आहेत.
सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. बायोमेट्रिक हजेरीचे काय झाले. कामगारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या हजेरी शेडचा वापर केला जातो की नाही .
फक्त कंत्राटी कामगारांवरच नियंत्रण कशासाठी असे प्रश्नही नगरसेवकांनी उपस्थित केले. कामगारांवर अविश्वास दाखविण्यात येत असल्याचेही यावेळी निदर्शनास आले. चर्चेनंतर सर्वमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

तंत्राविषयी माहिती
कंत्राटी कामगाराला नेमून दिलेल्या प्रत्येक बीट जिओफेसिंग करणार
बीटमध्ये काम करणाºया कंत्राटी कामगाराच्या मनगटावर घड्याळासारखे यंत्र बसविण्यात येणार
मनगटावरील यंत्र जीपीआरएस व जीपीएस दोन्ही प्रणालीवर काम करणार
कामगार किती वेळ कामावर होता हे स्पष्ट होणार
कंत्राटी कामगारांचे वेतन अद्ययावत प्रणालीप्रमाणे काढण्यात येणार
कामगारांनी त्यांच्या जागेवर दुसरा लावल्यास नियंत्रण कक्षातील कॅमेºयात स्पष्ट दिसणार
यंत्र खराब करण्याचा प्रयत्न केल्यास नियंत्रण कक्षाला अ‍ॅलर्ट मिळणार
कामगाराची तब्येत बिघडल्यास नियंत्रण कक्षाला नाडीचे ठोके समजणार

Web Title: Use of techniques to monitor contract workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.