रस्त्यांसाठी व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञानाचा वापर, पनवेलमध्ये ५ कोटी ३४ लाखांची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:16 AM2017-11-14T02:16:19+5:302017-11-14T02:16:36+5:30

रस्त्यावरील खड्डे ही सध्या सर्वच शहरातील महत्त्वाची समस्या बनली आहे. अनेक वेळा रस्ते दुरुस्त करून देखील वारंवार खड्डे पडणे ही नित्याची बाब आहे.

 Use of White Topping Technology for Roads, Use of Technology, Panvel Panvel 5 Crore 34 Lakhs | रस्त्यांसाठी व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञानाचा वापर, पनवेलमध्ये ५ कोटी ३४ लाखांची निविदा

रस्त्यांसाठी व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञानाचा वापर, पनवेलमध्ये ५ कोटी ३४ लाखांची निविदा

Next

वैभव गायकर
पनवेल : रस्त्यावरील खड्डे ही सध्या सर्वच शहरातील महत्त्वाची समस्या बनली आहे. अनेक वेळा रस्ते दुरु स्त करून देखील वारंवार खड्डे पडणे ही नित्याची बाब आहे. यामुळे वाहनचालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो, त्याचबरोबर संबंधित प्रशासनाच्या नावाने लोक बोटं मोडत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी पनवेल महानगर पालिकेने शहरात स्वामी नित्यानंद मार्ग ते गार्डन हॉटेल या ११०० मीटरच्या रस्त्यावर व्हाइट टॉपिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे . पनवेलमध्ये प्रथमच या तंत्रज्ञानाद्वारे रस्त्याची उभारली केली जाणार आहे.
यापूर्वी मुंबई, पुणे शहरात व्हाइट टॉपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते तयार केले गेले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार व्हाइट टॉपिंग या रस्ते बनविण्याच्या नवीन पद्धतीत रस्ता बनविताना सर्वप्रथम त्यावर डांबरीकरणाचा थर दिला जातो. त्याला अधिक मजबुती येण्यासाठी त्यावर रोलिंग करून व्हॉइट टॉपिंग पावडर व विशिष्ट रसायन वापरून तयार केलेले गरम मिश्रण याचा थर दिला जातो. तो वाळल्यावर दर्जेदार रस्ता तयार होतो. अति पाऊस पडणाºया भागातील रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. विशेष म्हणजे याकरिता कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्याची आवश्यकता नसल्याने त्याठिकाणच्या रहिवाशांना देखील त्याच त्रास होणार नाही. पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान पनवेलमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेलमधील स्वामी नित्यानंद मार्ग ते गार्डन हॉटेल (राष्ट्रीय महामार्ग ४) हा वाहनांच्या सततच्या रहदारीचा मार्ग आहे. पनवेल शहरात प्रवेश करताना मोठ्या प्रमाणात या मार्गाचा देखील उपयोग होत असल्याने वाहनांची सततची ये-जा याठिकाणी असते. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग ११०० मीटरचा आहे. लवकरच या कामाला सुरु वात होणार असून यासंदर्भात स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर काढून १० ते १२ दिवसांत कामाला सुरु वात होणार आहे. याकरिता ५ कोटी ३४ लाख रु पये एवढा खर्च येणार असल्याची माहिती पनवेल महानगर पालिकेचे शहर अभियंते संजय कटेकर यांनी दिली.
कटेकर यांनी सांगितले की, वोवर्ले पद्धतीने रस्त्याचे खोदकाम न करता त्याच्यावर तेथनिंग करून क ाँक्र ीटीकरण केले जाणार आहे. यावेळी त्या रस्त्याच्या मध्यभागी साडेतीन मीटरचे क ाँक्र ीटचे काम होणार आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला जलवाहिन्या, विद्युतवाहिन्या इतर गोष्टीचे नियोजन करून त्याच्यावर पेव्हर ब्लॉक मारले जाणार आहेत.
भाजपा, शेकापमध्ये श्रेयवादाची लढाई
रस्त्याच्या दुरु स्तीवरून सत्ताधारी भाजपा नगरसेवक विक्र ांत पाटील यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचा इशारा देखील दिला होता, तर शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी देखील यासंदर्भात नगरपरिषद अस्तित्वात असल्यापासून आपण पाठपुरावा करीत असल्याचा दावा केल्याने यासंदर्भात श्रेयाची लढाई सुरू होण्याचीशक्यता आहेत. तसेच या बकाल अवस्थेतील मार्गावर शेकाप नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी देखील स्वखर्चाने अनेक वेळा खड्डे बुजविले आहेत.
पनवेलमध्ये प्रथमत:च या तंत्रज्ञानाचा वापर
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची तसेच पालिकेच्या पैशांची बचत होणार आहे. साधारणत: एक कोटी रु पयांची बचत यामुळे होणार असल्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. द्रुतगती महामार्गावर ज्या प्रकारे अवजड वाहने धावत असतात तशा प्रकारची वाहने शहरातील अंतर्गत रस्त्यावर धावत नसल्याने हलक्या वाहनाच्या दृष्टीने हे रस्ते अत्यंत चांगले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या रस्त्यानंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांमध्ये देखील याच तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते दुरुस्त केले जातील.
काय आहे व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञान?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार व्हाइट टॉपिंग या रस्ते बनविण्याच्या नवीन पद्धतीत रस्ता बनविताना सर्वप्रथम त्यावर डांबरीकरणाचा थर दिला जातो. त्याला अधिक मजबुती येण्यासाठी त्यावर रोलिंग करून व्हॉइट टॉपिंग पावडर व विशिष्ट रसायन वापरून तयार केलेले गरम मिश्रण याचा थर दिला जातो. तो वाळल्यावर दर्जेदार रस्ता तयार होतो. अति पाऊस पडणाºया भागातील रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. या रस्त्याचे वयोमान पाच वर्षांपर्यंत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title:  Use of White Topping Technology for Roads, Use of Technology, Panvel Panvel 5 Crore 34 Lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.