शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

लसीकरणामुळे तिसरी लाट रोखता येणार, कोरोनाला रोखण्यासाठी सुविधांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:54 AM

कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभागाकडून पनवेल तालुक्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार यापुढे वैद्यकीय उपचार आणि लसीकरणावर भर देणार आहे.

अरुणकुमार मेहत्रे -कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको वसाहतीसह २९ महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पालिका आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर पनवेल ग्रामीण भागातदेखील कोरोना रुग्णांची संख्या घटत असून, नवीन रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभागाकडून पनवेल तालुक्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार यापुढे वैद्यकीय उपचार आणि लसीकरणावर भर देणार आहे.फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मार्च आणि एप्रिल महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली; तर मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले होते. यंदा कोरोनाची दुसरी लाट खूप हानिकारक ठरली. त्यात वैद्यकीय सेवा अपुरी तसेच लसीकरणाचा तुटवडा भासल्याने अनेक कोरोना रुग्णांचे मोठे हाल झाले. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने पनवेल पालिका क्षेत्रात बेडची कमतरता भासू लागली होती. त्यानुसार पनवेल पालिकासह तालुक्यातील नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही साथ मिळाली आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी चांगलेच लक्ष दिले आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासकीय पनवेल उपजिल्हा रुग्णालय, इंडिया बुल्स, कळंबोली समाजमंदिर येथे कोविड सेंटरची उभारणी केली. सद्य:परिस्थितीत भारतीय कपास निगमच्या गोदामामध्ये ८०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर लसीकरण वाढवण्यात येत आहे. कोविड टेस्ट करणे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता रुग्ण कमी सापडत असल्याने कोरोना नियंत्रणात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लसीकरणासाठी नियोजन सुरूयेथील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी उसळत आहे. ४५ वयोगटातील नागरिकांना दुसऱ्या कोविड डोससाठी मोठी कसरत करावी लागत आहे. लसीकरणाचा तुटवडा त्याचबरोबर कमी  लसीकरण केंद्रे आणि कोविन ॲप नोंदणी होत नसल्याने उडणारा गोंधळ यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सद्य:परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. भकोरोनावर मात करण्यासाठी वैद्यकीय उपचार वाढविण्यात येत आहेत. त्याचबरोबर नियोजनासह लसीकरणावर भर देण्यात येणार आहे.- डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, महापालिका पनवेल 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस