व्हॅलेंटाइन डे : गुलाबाच्या फु लांना मागणीवाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 04:03 AM2019-02-14T04:03:51+5:302019-02-14T04:04:11+5:30
प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठेत गुलाबाचे फूल आणि गुच्छांच्या किमती वाढल्या आहेत.
पनवेल : प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठेत गुलाबाचे फूल आणि गुच्छांच्या किमती वाढल्या आहेत. नेहमी दोन ते तीन रु पयांनी मिळणारे गुलाबाचे फूल या वेळी मात्र १० ते १५ रु पयांवर गेले आहे. पनवेलसह नवी मुंबईमधील बाजारपेठेत गुलाबांच्या फुलांची मागणी व्हॅलेंटाइन डे निमित्त वाढल्याचे दिसून आले.
१०० ते १२० रु पयांपर्यंत मिळणारा गुलाब फुलांच्या गुच्छांचा दर ३०० ते ४५० रुपयांपर्यंत उंचावल्याचे पाहावयास मिळाले. गिफ्ट कितीही मोठे असले तरी त्याच्याबरोबर प्रत्येक जण गुलाबाचे फूल भेट म्हणून देतात. पनवेलसह नवी मुंबईतील सर्व बाजारपेठा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी बहरून गेल्या आहेत. विशेष म्हणजे, गुलाबाचे फूल विकत घेताना तरु णवर्ग मोठ्या प्रमाणात दिसत होता. लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, केशरी या रंगांची गुलाबाची फुले बाजारात विक्रीसाठी आली आहेत.
फु लांचे दर
लाल रंगाच्या फुलांना मागणी आहे. आकाराने लहान लाल गुलाबाचे फूल काही दिवसांपासून १० ते १५रु पयांना मिळत आहे, तर मोठ्या आकाराच्या फुलांची किंमत १६ ते २५ रु पये एवढी आहे, तसेच गुलाब आणि इतर फुले असलेला गुच्छ ८० ते २०० रु .वरून थेट ४०० ते ६००
रु पयांपर्यंत पोहोचला आहे.