आगरदांडा : मुरुड तालुक्यात सध्या वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला आहे. वालाच्या शेंगासाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त आहे. थंडीत पडणारे दव व पीक तयार होते. जेवढी जास्त थंडी तेवढे पीक मोठ्या प्रमाणावर होते. हे पीक तयार होण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागतो. मात्र यावेळी महिना अगोदरच पीक घेण्यास शेतकरी आतूर आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर थंडी पडल्याने उपयुक्त दव वाल्याच्या पिकाला मिळाल्यामुळे वालाच्या पिकाचे चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा आहे.मुरुड तालुक्यातील उंडरगाव, खारअंबोली, जोसरांजण, शिघ्रे, तेलवडे, मजगाव व नांदगाव, उसरोली या परिसरात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विलास ठाकूर याने आपल्या पाच गुंठे शेतातील जमिनीत वालाची शेती केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, या पिकासाठी १० हजार रुपये खर्च जातो. त्यात जास्त मेहनत नसली तरी हा पिकाचा सुगंध वन्य प्राण्यांना आकर्षित करत असतो. वालाची रोपे रानटी डुकराचे आवडते खाद्य त्या प्राण्याला त्या पिकापासून वंचित करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. आम्हाला वालाच्या शेंगाचा फायदा किमान २५ ते ३० हजार रुपयांचा वर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आता लवकरच पोपटी करण्याचा हंगाम सुरू होणार आहे. (वार्ताहर)
वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू
By admin | Published: January 21, 2016 2:41 AM