पनवेलमध्ये अज्ञात चौकडीने ओला कार चालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:41 AM2018-05-30T01:41:54+5:302018-05-30T01:41:54+5:30

अज्ञात चौकडीने नेरूळ येथून उलवे येथे जाण्याच्या बहाण्याने ओला कारची बुकिंग करून सदर कार चालकाला पनवेलमधील निर्जन भागात नेऊन त्याला बेदम

The van driver was robbed by an unknown quartet in Panvel | पनवेलमध्ये अज्ञात चौकडीने ओला कार चालकाला लुटले

पनवेलमध्ये अज्ञात चौकडीने ओला कार चालकाला लुटले

googlenewsNext

पनवेल : अज्ञात चौकडीने नेरूळ येथून उलवे येथे जाण्याच्या बहाण्याने ओला कारची बुकिंग करून सदर कार चालकाला पनवेलमधील निर्जन भागात नेऊन त्याला बेदम मारहाण करून त्याच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह, दोन मोबाइल फोन, कारमधील टॅब व इतर ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना घडली. पनवेल शहर पोलिसांनी या चौकडीविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील तक्रारदार ओला कार चालकाचे नाव अकबर अली अजगर अली शेख (२४) असे असून तो गोवंडी भागात रहाण्यास आहे. अकबर अली हा त्याच्या गावातील ओळखीचे मिराज खान यांची स्विफ्ट डिझायर कार ओला कंपनीच्या वतीने भाड्याने चालवितो. अकबर हा ओला कंपनीचे भाडे घेऊन अंधेरी येथून नेरु ळ येथे आला होता. त्यानंतर तो पुन्हा भाड्याच्या प्रतीक्षेत असताना, त्याला ओला कंपनीकडून उलवे नोड येथे जाण्यासाठी भाडे मिळाले. त्यानुसार चौघे तरु ण त्याच्या कारमध्ये येऊन बसले. त्यानंतर चालक अकबर अली हा त्यांना घेऊन उलवेच्या दिशेने जात असताना, कारमध्ये बसलेल्या चौघा प्रवाशांनी मध्येच कार थांबवून उतरण्यास सुरुवात केली. त्यामुळे अकबरने त्यांच्याकडे १0८ रुपये भाड्याची मागणी केल्यानंतर त्यांनी भाडे देण्यास नकार दिला. मात्र त्यांना तीन चार किलोमीटर दूरवर असलेल्या घरापर्यंत सोडल्यास त्याला भाडे देण्याचे कबूल केले. त्यामुळे अकबर अली त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यास तयार झाल्यानंतर त्या चौघा तरुणांनी अकबरला ९ ते १0 किलोमीटर दूरवर निर्जन स्थळी नेऊन कार चालक अकबरच्या पोटावर चाकूसारखे हत्यार लावून त्याला जबरदस्तीने पाठीमागील सिटवर बसविले. त्यानंतर त्यातील एकाने कार चालविण्यास सुरुवात केली. या दरम्यान पाठीमागे बसलेल्या दोघा तरुणांनी अकबरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अकबर रक्तबंबाळ झाल्यानंतर चौघा तरुणांनी त्याच्याजवळ असलेली ५ हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाइल फोन, कारमध्ये असलेला टॅब लुटून त्या ठिकाणावरून पलायन केले. या मारहाणीत जखमी झालेल्या अकबरने आपली कार त्याच ठिकाणी सोडून प्रथम कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची तक्र ार दाखल केली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी चौघा अज्ञात लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The van driver was robbed by an unknown quartet in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.