धुळीमुळे वाशीतील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:59 PM2020-02-27T23:59:49+5:302020-02-27T23:59:52+5:30

डांबरीकरणासाठी रस्त्याची मशीनने सफाई

Vashi citizens suffer due to dust | धुळीमुळे वाशीतील नागरिक त्रस्त

धुळीमुळे वाशीतील नागरिक त्रस्त

Next

नवी मुंबई : वाशीतील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यावरील माती काढण्यासाठी मशीनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे उडणारी धूळ नागरिकांच्या घरांमध्ये जात असून, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्वच विभागात कामे सुरू आहेत. वाशी सेक्टर १५ मधील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. डांबरीकरण करण्यासाठी रस्त्यावर असलेली माती काढण्यासाठी मशीनचा वापर करण्यात आला. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. काम सुरू असलेल्या शेजारील इमारतींमधील घरांमध्येही मोठ्या प्रमाणावर धूळ गेली. ठेकेदारांच्या बेजबाबदारीमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले असून, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Vashi citizens suffer due to dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.