वाशी खाडीपूल वर्ष अखेरीस होणार खुला; दादा भुसेंनी केली पाहणी
By नारायण जाधव | Published: August 24, 2023 12:16 PM2023-08-24T12:16:52+5:302023-08-24T12:18:10+5:30
एका मार्गिकेवरून लवकरच वाहतूक
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबंई - राजधानी मुंबईला नवी मुंबई व उर्वरित महाराष्ट्राशी जोडणाऱ्या वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची गुरुवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (एमएसआरडीसी) यांनी पाहणी केली.
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या बहुचर्चित तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी सुरवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता. परंतु सर्व अडथळे पार झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने एल अॅन्ड टी कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार वेगाने काम सुरु आहे. तिसऱ्या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका होणार आहे. दोन्हीबाजूचे पूलांचे काम पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत ऑगस्ट २०२४ असून त्यातील एका बाजूकडील मुंबईहून पुण्याकडे जाणारा ३ लेनचा पूल नव्या या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. या कामावर ७७५ कोटी हून अधिक रक्कम खर्च करण्यात येत आहे.
त्यामुळे नव्या वर्षात वाशी खाडीवरील बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या खाडीपुलाचा मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठीचा तीन लेनचा खाडीपुल दृष्टीक्षेपात आला आहे