शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पोलीस हवालदाराच्या Google Pay वरुन झाला हत्येचा उलगडा: पत्नीच्या प्रियकरासह ४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:22 IST

वाशी रेल्वे पोलिसांनी रेल्वे पोलीस हवालदार विजय चव्हाण यांच्या हत्येचा उलगडा केला आहे

Navi Mumbai Crime:  नवी मुंबईत नवीन वर्षाच्या पहाटेच रेल्वे पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची दोघांनी गळा दाबून हत्या केली होती. हवालदार विजय चव्हाण यांचा खून करुन त्यांना मृतदेह ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलपुढे रेल्वे रुळांवर फेकला. मात्र मोटारमनच्या सर्तकर्तमुळे आरोपींचा बनाव समोर आला. मृतदेह सापडल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा तपास सुरु केला होता. त्यानंतर आता याप्रकरणात धक्कादायक असा खुलासा झाला आहे.

वाशी रेल्वे पोलिसांनी रेल्वे पोलीस हवालदार विजय चव्हाण यांच्या हत्येचा उलगडा केला आहे. याप्रकरणी विजय चव्हाणची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरासह चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. पनवेल जीआरपीमध्ये पोस्ट केलेले हेड कॉन्स्टेबल विजय रमेश चव्हाण हे १ जानेवारी रोजी घणसोली आणि रबाळे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (३५) हिचा प्रियकर भूषण निंबा ब्राह्मणे (२९) याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पूजा चव्हाण आणि भूषण याने एकमेकांशी लग्न करण्यासाठी विजय चव्हाणच्या हत्येचा कट रचला होता.

चौघांना केली अटक

पनवेल जीआरपीमध्ये तैनात असलेले चव्हाण हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून ते नवी मुंबईतील घणसोली गावातील चिंचाडी परिसरात राहत होते. ही घटना घडली त्यावेळी चव्हाण हे कर्तव्यावर नव्हते आणि साध्या वेशात होते. चव्हाण हे दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले होते. दोन्ही आरोपींनी त्यांना जास्त प्रमाणात दारु पाजली आणि नंतर त्यांची हत्या केल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता. मात्र तपासानंतर यामागे त्यांची पत्नी असल्याचे उघड झालं. पोलिसांनी तीन दिवसांत ब्राह्मणे, पूजा, प्रकाश उर्फ ​​धीरज गुलाब चव्हाण, प्रवीण आबा पानपाटील यांना अटक केली.

गाडीमध्ये केला खून

याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या देखरेखीखाली पोलRस उपायुक्त पाटील यांनी अनेक तपास पथके तयार केली. पाच दिवसांच्या तपासानंतर, ब्राह्मणेने कट रचल्यानंतर प्रवीण पानपाटीलने विजय चव्हाण यांना न्यू ईअरच्या पार्टीसाठी बोलावले. विजय चव्हाण आल्यानंतर त्यांनी धीरजच्या इको कारमध्ये त्यांच्यासोबत पार्टी केली. त्यानंतर रात्री ११.३० च्या सुमारास चव्हाण हे मद्यधुंद अवस्थेत असताना ब्राह्मणे आणि पानपाटील यांनी कारमध्ये दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला.

या सगळ्या प्रकारानंतर धीरज घाबरला. त्यामुळे विजय चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे रुळावर घेऊन जात असताना भूषण ब्राह्मणेने धीरजला तिथून जायला सांगितले. त्यानंतर धीरज मध्यरात्री १.३० च्या सुमारास थेट त्याच्या घरी आला आणि त्याने आपली कार पार्क करुन झोपी गेला. यानंतर भूषण ब्राह्मणे आणि पानपाटील हे चव्हाण यांच्या मृतदेहासोबत रेल्वे रुळांजवळ सुमारे चार तास लपून बसले होते आणि पहिली गाडी जाण्याची वाट पाहत होते. पहिली लोकल ट्रेन आली तेव्हा त्यांनी चव्हाण यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला आहे असं  दाखवण्यासाठी त्यांचा मृतदेह रुळांवर फेकून दिला. मात्र, ट्रेनच्या मोटरमनने त्यांना पाहून ट्रेन थांबवली आणि नंतर रेल्वे कंट्रोल रूमला माहिती दिली.

व्हिडीओ कॉलमध्ये सापडला आरोपी

तपासादरम्यान, पोलिसांनी चव्हाण यांचा मोबाइल फोन तपासला असता घणसोली परिसरातील एका अंडी विक्रेत्याला शेवटचे गुगल पे पेमेंट केल्याचे समोर आलं. पोलीस जेव्हा त्या दुकानदाराकडे गेले तेव्हा त्यांना शेजारीच एक वाईन शॉप दिसले. चौकशी केली असता चव्हाण यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती तिथे आल्याचे वाईन शॉपवाल्याने सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपींचा माग काढला. याशिवाय चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्याला शेवटचा व्हिडिओ कॉल करून त्या रात्री पार्टीला जात असल्याची माहिती दिली होती. या व्हिडिओ कॉलमध्ये धीरज हा मागे दिसत होता.

दुसरीकडे, पोलिसांनी चव्हाण यांच्या पत्नीचे फोन कॉल डिटेल्स देखील तपासले आणि त्यामध्ये तिने धीरजसोबत बऱ्याचवेळा फोनवरुन संभाषण केल्याचे आढळले. पोलिसांनी धीरजच्या उरण येथील इमारतीचे सीसीटीव्हीही तपासले असता तो  पहाटे दीड वाजता गाडी पार्किंग करताना दिसला. यावरून धीरजवर पोलिसांचा संशय बळावला. चौकशीदरम्यान, धीरजने इतर आरोपींची नावे पोलिसांना सांगितली. धीरजने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की ती गाडी त्याची नव्हती. मात्र ब्राह्मणेच्या चौकशीनंतर संपूर्ण कट उघड झाला.

पत्नीबाबत धक्कादायक खुलासे

तपासात पूजा विजय चव्हाणला कंटाळली होती. दारू पिण्यासोबतच त्याला वैश्यांना भेटण्याचे व्यसनही होते, असे तपासात उघड झाले आहे. अनेकदा हिंसक होऊन तो पत्नीवर हल्ला देखील करत असे. पूजाने तिचा प्रियकर ब्राह्मणेला याची माहिती दिली आणि त्यांनी विजयला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पूजाचा चुलत भाऊ धीरज आणि ब्राह्मणेचा मित्र पानपाटील याला या कटात सहभागी करुन घेतले. दुसरीकडे पूजाचे लग्नापूर्वी अनेक संबंध असल्याचे विजय चव्हाण यांना समजले होते आणि ती एकदा तिच्या आईच्या भावासोबत पळून गेली होती असेही तपासात समोर आले आहे. पोलीस चौकशीत ब्राह्मणे व्यतिरिक्त पूजाचे काही काळ धीरजसोबतही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस