वाशीमध्ये ‘गाथा भूमिपुत्रांची’ प्रदर्शन सुरू
By admin | Published: November 17, 2016 06:19 AM2016-11-17T06:19:00+5:302016-11-17T06:19:00+5:30
माजी महापौर तुकाराम नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाशीतील शिवाजी चौकात ‘गाथा भूमिपुत्रांची’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
नवी मुंबई : माजी महापौर तुकाराम नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाशीतील शिवाजी चौकात ‘गाथा भूमिपुत्रांची’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आगरी कोळी समाजाची वाटचाल व आतापर्यंत दिलेल्या लढ्याची माहिती देण्यात आली असून, अनेक मान्यवरांनी प्रदर्शनामध्ये उपस्थिती दर्शविली आहे.
नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी समाजाचा इतिहास शहरवासीयांना समजावा यासाठी वैभव नाईक यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून चरी कोपरचा सत्याग्रह, चिरनेरचा लढा, दास्तान फाट्यावरील रक्तरंजित आंदोलन, घणसोलीचे ऐतिहासिक महत्त्व, लोकनेते दि. बा. पाटील, पहिले आगरी आमदार नारायण नागू पाटील यांच्यासह चळवळीचा इतिहास व भूमिपुत्रांनी दिलेले लढे प्रदर्शनातून मांडले असून, प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. (प्रतिनिधी)