वाशीत दोन कोटींचा दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून महिलांना डांबून ठेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 02:12 AM2017-10-28T02:12:07+5:302017-10-28T02:14:42+5:30
नवी मुंबई : श्रीमंतांची वसाहत असलेल्या वाशी सेक्टर १७मधील कुसुम इमारतीमध्ये शुक्रवारी दुपारी दरोडा पडला.
नवी मुंबई : श्रीमंतांची वसाहत असलेल्या वाशी सेक्टर १७मधील कुसुम इमारतीमध्ये शुक्रवारी दुपारी दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दोन्ही महिलांना डांबून ठेवले व घरातील दागिन्यांसह रोख रक्कम असा २ कोटी ९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यापाºयाच्या घरामध्ये ही घटना घडली. कुसुम अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील व्यापाºयाच्या घरामध्ये दुपारी त्यांची पत्नी व मुलगी होती. साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाच अनोळखी व्यक्तींनी बेल वाजविली व घरामध्ये प्रवेश केला. बंदुकीचा धाक दाखवून दोघींनाही बांधून ठेवले व घरातील दागिन्यांसह रोख रक्कम असा १ कोटी ९३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रहिवाशांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरोडा पडलेल्या सहाव्या मजल्यावर दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. इमारतीच्या आवारामधील कॅमेºयामध्ये दरोडेखोरांचा चेहरा आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपासासाठी कॅमेºयाचे चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सुरक्षा रक्षकाचीही चौकशी सुरू आहे.