वसई : महिला पोलिसाला शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबित असलेल वसई पोलीस ठाण्यातील विनोद पारधी या पोलीस हवालदाराचा मृतदेह पाणजू येथील समुद्रकिनारी आढळून आला. मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत केली असावी असा पोलिसांचा संश आहे.पारधी गेले दोन दिवसांपासून बेपत्ता झाले होते. आज सकाळी पाणजू समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह आढळून आला. वसई पोलीस ठाण््यातील महिला हेडकॉन्स्टेबल आशा पाटील यांचशी पारधी यांचा १ डिसेंबर रोजी रात्री पोलीस ठाण्यात वाद झाला होता. यावेळी त्यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ करून जीवे ठार मारणची धमकी दिलची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ६ डिसेंबरला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणत आला होता. दुसऱ दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी २५ जानेवारी २०१६ रोजी पारधी यांना निलंबित करून मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. गेल दोन दिवसांपासून पारधी बेपत्ता असलची तक्रार त्यांच्या पत्नीने वसई पोलीस ठाण्यात केली होती. आज सकाळी पाणजू समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह आढळून आला. महिला पोलीस काँन्स्टेबलने आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवले व कोणतीच शहानिशा न करता गुन्हा दाखल करून वरीष्ठ मानसिक त्रास देत असल्याचा त्यांचा दावा होता. त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांचे मामेभाऊ हरीश पवार यांनी केला आहे. मात्र हे आरोप अधिक्षक शारदा राऊत यांनी फेटाळले होते.
वसईत निलंबित पोलीस हवालदाराची आत्महत्या?
By admin | Published: February 08, 2016 2:27 AM