कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली; कोथिंबीर, कैरी, गाजर महागले

By नामदेव मोरे | Published: April 24, 2023 06:51 PM2023-04-24T18:51:14+5:302023-04-24T18:51:28+5:30

शेवगा, वाटाणा मिर्ची स्वस्त झाली, शेवगा शेंग च्या दरात घसरण झाली आहे. शेवगा प्रतिकलो २० ते ४० वरुन १८ ते २६ वर आले आहेत.

Vegetable arrivals fell due to hot summer; Coriander, curry, carrot became expensive | कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली; कोथिंबीर, कैरी, गाजर महागले

कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली; कोथिंबीर, कैरी, गाजर महागले

googlenewsNext

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे. ग्राहकांकडून मागणीही घटली असून शेवगा शेंग, वाटाना, हिरवी मिर्चीचे दर कमी झाले आहेत. कैरी, कोथिंबीर, आवळा, गाजरचे दर या आठवड्यात तेजीत आहेत.

बाजार समितीमध्ये १७ एप्रिलला ६५२ वाहनांमधून २९८९ टन भाजीपाला विक्रीसाठी आला होता. त्यामध्ये ५ लाख ३६ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. २४ एप्रिलला ५९४ वाहनांमधून २५५६ टन भाजीपाल्याची आवक झाली असून यामध्ये ३ लाख ८४ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. उन्हाळ्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. सुट्यांमुळे चाकरमानी गावी जाऊ लागल्यामुळे ग्राहकांकडूनही भाजीपाल्याला मागणी कमी झाली आहे. यामुळे गवार, घेवडा, कोबीसह अनेक भाज्यांचे दर स्थिर आहेत. या आठवड्यात आवळ्याचे दर २८ ते ३६ रुपये प्रतीकिलोवरून ३४ ते ४४ रुपये झाले आहेत. कोथिंबीर जुडी ८ ते १४ वरून १५ ते ३० रुपये झाली आहे. कैरीची आवक कमी झाल्यामुळे त्याचे दर प्रतिकिलो १८ ते २६ वरून ३० ते ४० रुपये झाले आहेत.

शेवगा शेंग च्या दरात घसरण झाली आहे. शेवगा प्रतिकलो २० ते ४० वरुन १८ ते २६ वर आले आहेत. वाटाणा ६० ते ११० रुपयांवरून ५० ते ७० रुपयांवर व हिरवी मिर्ची ४० ते ५० वरुन ३० ते ४० वर आली आहे. बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की उन्हाळ्यामुळे आवक कमी आहे व उठावही नाही. मे अखेरपर्यंत भाजीपाल्याची आवक कमीच राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
बाजार समितीमधील एक आठवड्यातील प्रतीकिलो बाजारभाव

वस्तू - १७ एप्रिल - २४ एप्रिल
आवळा - २८ ते ३६ - ३४ ते ४४
भेंडी २५ ते ४४ - २५ ते ४०
फरसबी ३६ ते ५० - ३० ते ५०
फ्लॉवर १० ते १४ - १० ते १६
गाजर १४ ते २० - २० ते २६
कैरी १८ ते २६ - ३० ते ४०
ढोबळी मिर्ची २२ ते २८ - २० ते ३०
शेवगा शेंग २० ते ४०- १८ ते २६
वाटाणा ६० ते ११० - ५० ते ७५
मिर्ची ४० ते ५० - ३० ते ४०
कोथिंबीर ८ त १४ - १५ ते ३०

Web Title: Vegetable arrivals fell due to hot summer; Coriander, curry, carrot became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.