नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे. ग्राहकांकडून मागणीही घटली असून शेवगा शेंग, वाटाना, हिरवी मिर्चीचे दर कमी झाले आहेत. कैरी, कोथिंबीर, आवळा, गाजरचे दर या आठवड्यात तेजीत आहेत.
बाजार समितीमध्ये १७ एप्रिलला ६५२ वाहनांमधून २९८९ टन भाजीपाला विक्रीसाठी आला होता. त्यामध्ये ५ लाख ३६ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. २४ एप्रिलला ५९४ वाहनांमधून २५५६ टन भाजीपाल्याची आवक झाली असून यामध्ये ३ लाख ८४ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. उन्हाळ्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. सुट्यांमुळे चाकरमानी गावी जाऊ लागल्यामुळे ग्राहकांकडूनही भाजीपाल्याला मागणी कमी झाली आहे. यामुळे गवार, घेवडा, कोबीसह अनेक भाज्यांचे दर स्थिर आहेत. या आठवड्यात आवळ्याचे दर २८ ते ३६ रुपये प्रतीकिलोवरून ३४ ते ४४ रुपये झाले आहेत. कोथिंबीर जुडी ८ ते १४ वरून १५ ते ३० रुपये झाली आहे. कैरीची आवक कमी झाल्यामुळे त्याचे दर प्रतिकिलो १८ ते २६ वरून ३० ते ४० रुपये झाले आहेत.
शेवगा शेंग च्या दरात घसरण झाली आहे. शेवगा प्रतिकलो २० ते ४० वरुन १८ ते २६ वर आले आहेत. वाटाणा ६० ते ११० रुपयांवरून ५० ते ७० रुपयांवर व हिरवी मिर्ची ४० ते ५० वरुन ३० ते ४० वर आली आहे. बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की उन्हाळ्यामुळे आवक कमी आहे व उठावही नाही. मे अखेरपर्यंत भाजीपाल्याची आवक कमीच राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.बाजार समितीमधील एक आठवड्यातील प्रतीकिलो बाजारभाव
वस्तू - १७ एप्रिल - २४ एप्रिलआवळा - २८ ते ३६ - ३४ ते ४४भेंडी २५ ते ४४ - २५ ते ४०फरसबी ३६ ते ५० - ३० ते ५०फ्लॉवर १० ते १४ - १० ते १६गाजर १४ ते २० - २० ते २६कैरी १८ ते २६ - ३० ते ४०ढोबळी मिर्ची २२ ते २८ - २० ते ३०शेवगा शेंग २० ते ४०- १८ ते २६वाटाणा ६० ते ११० - ५० ते ७५मिर्ची ४० ते ५० - ३० ते ४०कोथिंबीर ८ त १४ - १५ ते ३०