मुंबई, ठाणे व उल्हासनगर महापालिकेची व राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमुळे सर्व माथाडी बोर्डांनी कामगारांना सुटी जाहीर केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बहुतांश कामगार निवडणुकांसाठी गावाकडे रवाना झाले आहेत. यामुळे भाजी व फळ मार्केटवगळता इतर मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते. राज्यातील कामगारांची सर्वात मोठी ताकद म्हणून माथाडी कामगारांकडे पाहिले जात आहे. पूर्वी मुंबई व उपनगरांपुरते मर्यादित असणारी संघटना राज्यभर पसरू लागली आहे. संघटितपणामुळे कामगारांना राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे शशिकांत शिंदे चार वेळा आमदार व मंत्री राहिले असून नरेंद्र पाटील हेही विधान परिषद सदस्य आहेत. याशिवाय मुंबई, नवी मुंबई व इतर महानगरपालिकांमध्येही माथाडी कामगार नगरसेवक म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत गावाकडे मतदार व कार्यकर्ते ही भूमिका पार पाडणारे कामगार आता थेट निवडणूक रिंंगणात आहेत.
भाजी, फळवगळता बाजार समिती बंद
By admin | Published: February 22, 2017 7:06 AM