भाजीपाल्याची आवक वाढली; टोमॅटो, मिर्चीसह कोथिंबीरचे दर निम्यावर
By नामदेव मोरे | Published: August 17, 2023 07:50 PM2023-08-17T19:50:26+5:302023-08-17T19:50:41+5:30
एक दिवसात ८ लाख जुडी पालेभाज्यांची आवक
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. पंधरा दिवसामध्ये टोमॅटो, मिर्ची, कोथिंबीरचे दर निम्यावर आले आहेत. पालेभाज्याही स्वस्त झाल्या असून यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून भाव मिळेनासा झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.
बाजार समितीमध्ये गुरूवारी राज्याच्या विविध भागातून ६८९ वाहनांमधून २६८२ टन भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये ८ लाख २९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एकाच दिवशी २ लाख ७३ हजार जुडी कोथिंबीर व दोन लाख पेक्षा जास्त जुडी मेथीसह पालकची आवक झाली आहे. ऑगस्टच्या सुरूवातीला १० ते १६ रुपये दराने विकली जाणाऱ्या कोथंबिरचे दर ५ ते ८ रुपये झाले आहेत. मेथी १० ते १५ वरून ६ ते ८, पालक ६ ते १० रुपयांवरून ५ ते ७ रुपये झाले आहेत. टोमॅटोच्या दरामध्येही मोठी घसरण झाली आहे. दोन आवठड्यात बाजारभाव ८० ते १०० वरून ४० ते ६० वर आले आहेत.हिरवी मिर्ची, बटाटा, भेंडी, फरसबी, फ्लॉवर, काकडी, कारली, ढोबळी मिर्ची, शेवगा शेंग यांच्या दरामध्येही घसरण झाली आहे.
भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने दर कमी होऊ लागले आहेत. पुढील काही दिवस आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. शंकर पिंगळे, संचालक भाजीपाला मार्केट
बाजार समितीमधील भाजीपाल्याचे दर पुढील प्रमाणे
- वस्तू - १ ऑगस्ट - १७ ऑगस्ट टाेमॅटो - ८० ते १०० - ४० ते ६०
- मिर्ची - ४५ ते ६० - २८ ते ३२
- बटाटा ११ ते १७ - ९ ते १४
- भेंडी ३० ते ४४ - ३० ते ३८
- फरसबी - ६५ ते ७२ - ५० ते ६०
- फ्लॉवर - १५ ते २२ - १४ ते २०
- काकडी - २० ते ३२ - १५ ते २५
- कारली - ३८ ते ४५ - ३५ ते ४०
- ढोबळी मिर्ची - ६५ ते ७५ - ४० ते ६०
- शेवगा शेंग - ४० ते ४५ - ३५ ते ४०
- भालेभाज्या प्रतीजुडी
- वस्तू - १ ऑगस्ट - १७ ऑगस्ट
- कोथिंबीर - १० ते १६ - ५ ते ८
- मेथी १० ते १५ - ६ ते ८
- पालक - ६ ते १० - ५ ते ७
- शेपू १० ते १४ - ६ ते ८