- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून २८५ गाळ्यांचे विस्तारित भाजी मार्केट उभारले आहे. दोन वेळा अधिकृत व तीन वेळा अनधिकृतपणे उद्घाटन होऊनही अद्याप मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले नाही. मार्केट सुरू करण्याचे आव्हान व्यापाऱ्यांसह प्रशासनासमोरही उभे राहिले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर मुंबईमधील मार्केट टप्प्याटप्प्याने नवी मुंबईमध्ये स्थलांतरित केली. १९९६ मध्ये भाजी मार्केट स्थलांतरित केले. व्यापाºयांसाठी ९३६ गाळे उपलब्ध करून देण्यात आले; परंतु अनेकांना गाळे उपलब्ध होऊ शकले नाहीत. बिगरगाळाधारक व्यापारी लिलावगृह व इतर ठिकाणी व्यापार करत होते. व्यापारासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी एपीएमसीने २००३ मध्ये २८५ गाळ्यांचे विस्तारित मार्केट बांधण्याचा निर्णय घेतला.
२१ कोटी रुपये खर्च करून २००५ मध्ये मार्केटचे बांधकाम पूर्ण केले. २००८ मध्ये गाळ्यांचे वितरण केले. व्यापाºयांनी तत्काळ व्यापार सुरू केला; परंतु जुन्या व नवीन मार्केटला जोडणारा रस्ता नसल्याने व्यापार थांबवावा लागला. यानंतर रोडचे काम करण्यात आले. फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मार्केटचे उद्घाटन करण्यात आले. यानंतरही काही महिन्यांत पुन्हा मार्केट बंद पडले. मार्केट सुरू करण्यासाठीचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर व्यापाºयांनी मार्केटच्या वापरामध्ये बदल करण्याची मागणी शासनाकडे केली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा करून शासनाकडून वापर बदल करण्यास परवानगी मिळविली.
गाळे बंदिस्त करून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुन्हा मार्केटचे उद्घाटन करण्यात आले.विस्तारित भाजी मार्केटचे बांधकाम पूर्ण होऊन ११ वर्षे झाली आहेत. या कालावधीमध्ये दोन वेळा अधिकृतपणे व तीन वेळा व्यापाºयांनी स्वत:च मार्केटचे उद्घाटन केले; परंतु उद्घाटनानंतर काही दिवसांमध्ये पुन्हा येथील व्यवहार बंद पडत आहेत.
कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने वारंवार पाठपुरावा करून मार्केट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत; परंतु काही विघ्नसंतोषी नागरिक तक्रारी करून मार्केट सुरू होण्यास अडथळे निर्माण करत आहेत. मार्केटमधील अनेक कामे अपूर्ण आहेत. मीटर बॉक्स उघडे असल्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये तळमजल्यावर नऊ व पहिल्या मजल्यावर नऊ सार्वजनिक प्रसाधनगृह सुरू केली आहेत; परंतु त्याची योग्य पद्धतीने देखभाल होत नाही. मलनि:सारणचा व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठीचे पाइप तुटले आहेत. देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत केली जावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे.
विस्तारित भाजी मार्केट बांधण्यासाठी व ते प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले आहेत. बाजार समितीचे अधिकारी, आमदार मंदा म्हात्रे या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले. मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे एवढीच अपेक्षा असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- रामदास चासकर, सचिव, कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनमार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यापार चालत नसल्यामुळे आम्ही स्थानिक आमदारांच्या मदतीने शासनाकडे पाठपुरावा करून वापरामध्ये बदल करून घेतला आहे. मार्केट सुरू करण्यासाठी येणाºया अडचणी प्रशासनाने सोडवाव्या, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.- राहुल पवार, कायदेविषयी सल्लागार, व्यापारी वेल्फेअर असोसिएशन
विस्तारित भाजी मार्केटमधील समस्या सोडविण्यात याव्यात. प्रसाधनगृहाची देखभाल केली जावी, उघड्या विद्युत मीटरबॉक्समुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मार्केटमध्ये अनेक समस्या असून प्रशासनाने त्या सोडवाव्यात, एवढीच अपेक्षा.- उत्तम काळे, अध्यक्ष, कृषी उत्पन्न वेल्फेअर असोसिएशन
विस्तारित भाजी मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व समस्या सोडविण्यात येतील.- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी
खर्च व्यर्थ जाऊ नये
विस्तारित भाजी मार्केट सुरू होऊ नये यासाठी काही विघ्नसंतोषी मंडळी अडथळे आणत आहेत, हे अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने मदत करावी. प्रशासनाने २१ कोटी रुपये खर्च केले आहेत. उर्वरित कामे करण्यासाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून बांधलेले मार्केट बंद राहू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.