शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

भाजी मार्केट पडणार आगीच्या भक्षस्थानी

By admin | Published: May 23, 2017 2:04 AM

एपीएमसीच्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये अग्निशमन विभागाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. गाळ्यांमध्ये सर्वत्र कागदी पुठ्ठ्यांचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एपीएमसीच्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये अग्निशमन विभागाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. गाळ्यांमध्ये सर्वत्र कागदी पुठ्ठ्यांचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. या ढिगाऱ्यांमध्येच परप्रांतीय कामगार स्टोव्हचा वापर करून स्वयंपाक करत आहेत. विडी, सिगारेट व गांजा ओढत असून यामुळे मार्केटला आग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजार समितीच्या मूळ भाजी मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने विस्तारित भाजी मार्केटची निर्मिती केली. पाच वर्षापूर्वीच या मार्केटचे लोकार्पण करण्यात आले. पण व्यापाऱ्यांनी अनेक अडचणी सांगून प्रत्यक्ष व्यापार करणे थांबविले व पुन्हा जुन्या मार्केटमध्ये गाळे भाडेतत्वावर घेवून व्यापार करण्यास सुरवात केली. नवीन मार्केटमधील गाळे निर्यातदारांना व इतर व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. निर्यातदार या गाळ्यांचा वापर पॅकिंगसाठी करू लागले आहेत. या कामासाठी मोठ्याप्रमाणात परप्रांतीय कामगारांना बेकायदेशीरपणे आश्रय देण्यात आला आहे. कामगार गाळ्यांमध्येच वास्तव्य करत आहेत. पॅकिंगसाठी आणलेले कागदी पुठ्ठ्यांचे ढिगारे मार्केटमध्ये सर्वत्र ठेवण्यात आले आहेत. या ढिगाऱ्याला लागूनच कामगार स्टोव्हचा वापर करून स्वयंपाक करत आहेत. स्टोव्हसाठी लागणाऱ्या रॉकेलचाही अवैधपणे साठा करण्यात आला आहे. बहुतांश कामगारांना विडी, सिगारेट व काहींना गांजा ओढण्याचे व्यसन आहे. कामगार विडी, सिगारेटची थोटके कुठेही टाकत आहेत. या सर्वांमुळे मार्केटमध्ये आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विस्तारित भाजी मार्केटमधील अग्निशमन यंत्रणा दोन वर्षापासून बंद आहे. अशा स्थितीमध्ये आग लागल्यास मोठ्या प्रमाणात वित्त जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. बाजारसमितीचे अधिकारी व कर्मचारी येथूनही अवैधपणे वसुली करत असल्याची चर्चा आहे. वैयक्तिक लाभासाठी येथील अनागोंदी कारभाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. गाळे भाड्याने घेतलेल्या निर्यातदार व इतर व्यावसायिकांना स्वत:चे काम कमी पैशात व्हावे असे वाटत आहे. यामुळे परप्रांतीय कामगारांना अल्प मजुरीमध्ये राबवून घेत असून त्यांना राहण्यासाठी गाळ्यामध्ये जागा उपलब्ध करून देत आहेत. परंतु यामुळे मार्केटची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे दिसत असूनही सर्वच घटक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. विस्तारीत भाजी मार्केटमधील स्थिती एपीएमसीची अग्निशमन यंत्रणा दोन वर्षापासून बंद विद्यूत बॉक्स व मिटर रूमची दुरावस्थागाळ्यांमध्ये सर्वत्र कागदी पुट्यांचे ढिगारे कागदपी पुट्यांच्या बाजूलाच स्टोव्ह च्या सहाय्याने स्वयंपाकगाळ्यांमध्ये अनधिकृतपणे रॉकेलची साठेबाजीकामगार बिडी, सिगारेट ओढून थोटके मार्केटमध्ये टाकतातआग लागल्यास सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना नाही