प्राची सोनवणेनवी मुंबई : अवकाळी पावसाचा फटका शेतमालाच्या उत्पादनावर झाला असून, महिनाभरापासून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. एपीएमसीतील भाजीपाला व्यापाºयांनी दिलेल्या माहितीनुसार मालाची आवक कमी झाल्याने, तसेच उत्पन्नात घट झाली असून, ग्राहकांना मागणीनुसार माल पुरविणे अवघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातून येणाºया पालेभाज्यांची आवक घटली असून, प्रतिजुडी १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.भाज्यांच्या दरांमध्ये झालेली वाढ पाहता घाऊक बाजारातून माल खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. शेतमालाचे उत्पन्न घटले असून, भाजीपाल्यासारखा शीघ्र नाशवंत माल टिकविणे अशक्य असल्याने शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या गाड्या इतर वेळी ६०० ते ६५० गाड्यांची आवक होणाºया भाजीपाल्याची आवक घटली असून, सद्यस्थितीला ४५० ते ५०० गाड्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. गरज आहे तेवढाच माल खरेदी केला जात असून, मालाला मनजोगी किंमत मिळत नसल्याने शेतकºयांनी देखील एपीएमसी बाजार समितीत माल विक्रीकरिता पाठ फिरविली आहे. गेल्या दोन आठवड्यांचा तुलनेत या आठवड्यात दर स्थिरावल्याची माहिती व्यापारीवर्गाने दिली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर ३५ ते ४० रुपयांच्या घरात गेले आहे. तर याच भाज्या किरकोळ बाजारात ६० ते ९० रुपये दराने विकल्या जात आहेत. यामुळे ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. वातावरणात हा परिणाम झाल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली आहे.घाऊक बाजारातील दर (प्रतिकिलो)भेंडी - ३८ रुपयेघेवडा - ४० रुपयेचवळी - २६ रुपयेफरसबी - ३८ रुपयेफ्लॉवर- ३० रुपयेगवार - ३८ रुपयेढोबळी मिरची - ४३ रुपयेटोमॅटो - २४ रुपयेकोबी - २९ रुपये
भाजीपाल्याचे दर चढेच , मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:34 AM