शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसईसह २० आरटीओत वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र!

By नारायण जाधव | Published: May 10, 2023 5:01 PM

मालकीच्या, एसटी महामंडळाच्या जागांना त्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसई आरटीओ कार्यालयांसह राज्यातील २० आरटीओच्या कार्यक्षेत्रात वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र सुरू करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. या कार्यालयांवर ३६२ कोटी ५२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मालकीच्या, एसटी महामंडळाच्या जागांना त्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सूचनेनुसार ही वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यामुळे राज्यातील आरटीओंची मोठी डोकेदुखी दूर होणार आहे. 

हे आहेत ते २० आरटीओ ज्या २० आरटीओंच्या कार्यालय अंतर्गत या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रांना मान्यता दिली आहे, त्यामध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव, साांगली, अकलूज, गडचिरोली, कराड, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, हिंगोली, पेण, यवतमाळ, जालना, सिंधुदुर्ग, नागपूर (पूर्व) यांचाही समावेश आहे.

काय आहे वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र?दरवर्षी रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असून गाडी चांगल्या स्थितीत नसणे हेदेखील अपघाताचे कारण ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांची फिटनेस चाचणी अत्यंत काटेकोरपणे करणे तितकेच महत्त्वपूर्ण असते. यामुळे स्वयंचलित यंत्रणेमार्फत गाड्यांची तपासणी या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रांत करणे सोपे होणार आहे.

यांची होते तपासणीफिटनेस चाचणीमध्ये गाडीचे ब्रेक, टायर, इंजिन,लाइट, आदींची संपूर्ण तपासणी करण्यात येते. त्यासाठी टेस्ट ट्रॅकवर गाडी चालवून पाहिले जात असून ती व्यवस्थित असल्यास आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येते. चाचणीच्या वेळी गाडीमध्ये काही दोष आढळल्यास वाहनचालकाला गाडीची पुन्हा फिटनेस चाचणी करावी लागते.

न्यायालयाने टोचले होते कानफिटनेस चाचणीवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. वाढत्या रस्ते अपघाताला विविध कारणे असले तरी गाडी सुस्थितीत नसणे, हेदेखील अपघात घडण्यामागचे महत्त्वाचे कारण असून आजही रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. त्यानंतर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने राज्यात ही वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNavi Mumbaiनवी मुंबई