नवी मुंबई : कोकण भवनमधील राज्य वस्तू व सेवा कर रायगड यांच्यावतीने ई वे बिल तपासणीसाठी जेएनपीटी रोडवर विशेष मोहीम राबविण्यात आली. दिवसभर ५९ वाहनांची तपासणी करून, एका वाहनावर जप्तीची कारवाई केली आहे.जीएसटी विभागाच्या रायगड उपआयुक्त सुनीता थोरात व अलिबाग उपआयुक्त संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी महामार्गावर ही मोहीम राबविण्यात आली. न्हावा शेवा बंदराकडे जाणाऱ्या व येणाºया वाहनांची कागदपत्रे तपासली. वाहनधारकांकडे ई वे बिल आहेत का याची तपासणी करण्यात आली. दिवसभर तब्बल ५९ वाहनांची तपासणी करण्यात आली. ५८ वाहनधारकांकडे बिले आढळून आली असून एका वाहनाकडे बिल आढळून आले नाही. ई वे बिल नसलेले वाहन जप्त करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. अचानक सुरु केलेल्या कारवाईमुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. या मोहिमेदरम्यान वाहतूकदार संघटनांच्या संस्थांचे समुपदेशन करण्यात आले. सर्व व्यापारी, वाहन चालक व वाहतूकदार यांनी ई वे बिल तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन उपआयुक्त सुनीता थोरात यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.ई वे बिल संदर्भात नियमांचे वाहतूकदारांकडून पालन होते का याची पाहणी करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित केली होती. या अभियानाअंतर्गंत वाहतूकदार, व्यापारी यांनाही आवश्यक माहिती देण्यात आली. वाहनांची तपासणी करण्यात आली व ई वे बिल न आढळलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.- सुनीता थोरात, उपआयुक्त जीएसटी रायगड
जीएसटी विभागाकडून वाहनांची तपासणी; ई वे बिल नसलेले वाहन केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:36 PM