नवी मुंबई : शहरातील वाहन सर्व्हिस सेंटर चालकांनी रस्ते आणि पदपथावर बस्तान मांडले आहे यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य देखील पसरत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून महापालिकेने अशा सर्व्हिस सेंटरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरात वाहनांच्या वाढणाºया संख्येचा फायदा सर्व्हिस सेंटरला होत असल्याने अनेक व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे पदपथ आणि रस्त्यावरच सर्व्हिस सेंटर थाटले आहेत. या सर्व्हिस सेंटरमुळे वाहने धुण्यासाठी वाहनांची देखील गर्दी होत आहे. यामुळे अनेक ठिकाणची बेकायदा सर्व्हिस सेंटर नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळा ठरू लागली आहेत. सर्व्हिस सेंटरमध्ये पदपथांवर वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्त्यावरून चालावे लागत आहे. नेरूळ, सानपाडा, तुर्भे, वाशी आदी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर सर्व्हिस सेंटरमुळे परिसराला बकाल रूप आले असून सर्व्हिस सेंटरमधील सांडपाणी पावसाळी नाल्यांमध्ये सोडले जात आहे. यामुळे परिसरात डासांचे प्रमाण देखील वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.शहरातील अनेक सर्व्हिस सेंटर चालक बोअरिंगचे पाणी वापरत असले तरी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सर्व्हिस सेंटरला होणाºया पाणीपुरवठ्याची माहिती महापालिकेने घ्यावी आणि बेकायदेशीरपणे थाटलेल्या सर्व्हिस सेंटरवर कारवाई करण्याची नागरिक करीत आहेत.