उपनगराध्यक्षपदाची गुरु वारी निवडणूक
By admin | Published: December 26, 2016 06:20 AM2016-12-26T06:20:53+5:302016-12-26T06:20:53+5:30
नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होऊन मुरुड शहरातील नागरिकांनी शिवसेनेला बहुमत दिले असून, ९ नगरसेवक व थेट नगराध्यक्षपदसुद्धा शिवसेनेला प्राप्त
नांदगाव/ मुरु ड : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होऊन मुरुड शहरातील नागरिकांनी शिवसेनेला बहुमत दिले असून, ९ नगरसेवक व थेट नगराध्यक्षपदसुद्धा शिवसेनेला प्राप्त होऊन पूर्ण बहुमताची सत्ता शहरी नागरिकांनी शिवसेनेला दिली. २९ डिसेंबर रोजी मुरु ड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर होणार आहेत. उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे मुरु ड शहर अध्यक्ष व नगरसेवक प्रमोद भायदे तर शिवसेनेच्या तिकिटावर प्रथमच निवडून आलेल्या कौसीन दरोगे यांच्यात चुरस असून पक्षश्रेष्ठी कोणाच्या बाजूने कौल देईल त्यावर या दोघांपैकी एक उपनगराध्यक्ष बनणार आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठीसुद्धा शिवसेनेकडून दोन नावे चर्चेत आहेत. माजी नगराध्यक्ष रहीम कबले व माजी नगरसेवक महेश भगत यांच्या नावाला अधिक पसंती मिळत आहे. गटनेते पदासाठी शिवसेनेच्या जुन्या जाणत्या नगरसेविका मुग्धा जोशी यांचे नाव ऐकिवात आहे. या निवडीच्या अध्यक्षा व पीठासन अधिकारी म्हणून नव्या नियमाप्रमाणे नगराध्यक्षा स्नेहा पाटील या कामकाज पाहणार असून नियमाप्रमाणे कामकाज चालणार आहे. २९ डिसेंबर रोजी या सर्व निवडी होणार असल्याचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सांगितले. मुरु ड नगरपरिषद निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी महेंद्र दळवी यांनी निभावून शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. (वार्ताहर)