वाशीतील अत्याचाराची घटना: ‘तो’ तरुण समलैंगिक टोळीचा बळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:02 AM2019-09-28T03:02:46+5:302019-09-28T07:00:49+5:30

तपासाकरिता दोन पथके; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे

The victim of the 'he' young gay gang? | वाशीतील अत्याचाराची घटना: ‘तो’ तरुण समलैंगिक टोळीचा बळी?

वाशीतील अत्याचाराची घटना: ‘तो’ तरुण समलैंगिक टोळीचा बळी?

Next

नवी मुंबई : तरुणावर सामूहिक अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे लागले आहेत. त्यानुसार दोन पथकांमार्फत पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी ही घटना घडली, तो परिसर अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांच्या गाठीभेटीचा असल्याने समलैंगिक टोळीचा तो बळी ठरल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

वाशीतील सागर विहार परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय तरुणावर पाच जणांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, अत्याचारानंतर त्यांनी पीडित तरुणाच्या गुदमार्गात नारळ कोंबल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेनंतर तरुणाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचू शकले आहेत. परंतु संबंधितांवर गुन्हा दाखल करताना हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात चालढकल झाल्याचा आरोप पीडिताच्या नातेवाइकांकडून होत आहे.
सागर विहार परिसरात ज्या ठिकाणी ही घटना घडली, तो परिसर प्रेमीयुगुल व समलैंगिक संबंध असणाऱ्यांच्या भेटीचे ठिकाण आहे.
केवळ फेरफटका मारण्यासाठी भोवतालच्या परिसरात गेलेला पीडित तरुण त्यांच्या कृत्याचा बळी ठरल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या घटनेनंतरदेखील सागर विहार परिसरात प्रेमीयुगुलांना तसेच गर्दुल्ल्यांना आवर घालण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरत आहेत.

पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे
या गुन्ह्याच्या तपासाकरिता पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातून काही महत्त्वाचे सुगावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याद्वारे लवकरच आरोपींना पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The victim of the 'he' young gay gang?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.