Video: पनवेल-महाड बस जळून खाक, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे 22 प्रवाशी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:29 PM2022-05-13T16:29:16+5:302022-05-13T16:29:46+5:30
पनवेल येथून निघालालेली बस महाडला जात असताना कर्नाळा बर्ड सेंच्युरीच्या चढाला लागल्यानतंर गाडीतून अचानक धूर निघायला लागला
नवी मुंबई - पनवेल बस स्थानकातून महाडला जाणाऱ्या एसटीला भीषण अपघात झाला. या अपघातात अचानाक आग लागल्याने गाडी संपूर्णपणे जळाली असून बसचा अगदी सांगाडाच उरला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही. या बसमधून 22 ते 23 प्रवासी प्रवास करत होते. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळात फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गाडीचा वरील भाग जळाला होता.
पनवेल येथून निघालालेली बस महाडला जात असताना कर्नाळा बर्ड सेंच्युरीच्या चढाला लागल्यानतंर गाडीतून अचानक धूर निघायला लागला. त्यावेळी, ड्रायव्हरने प्रसंगावधानता दाखवत गाडी थांबवली आणि कडक्टरने प्रवाशांना तात्काळ बाहेर काढले. त्यावेळी, बसमध्ये 22 ते 23 प्रवासी होते. प्रवासांनी भरलेली ही बस तात्काळ आपले सामान घेऊन गाडी रिकामी केली. दरम्यान, एका महिला प्रवाशाची बॅग गाडीतच राहिली, त्यामध्ये 15 हजार रुपये होते. या दुर्घटनेत ते 15 हजार रुपये जळाले. सुदैवाने कुठलिही जिवीतहानी झाली नाही. यावेळी, पनवेल फायर ब्रिगेड आणि सिडको फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग लागलेली बस विझवली. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.
पनवेल-महाड एसटी बस जळून खाक, कर्नाळ्यानजीक घडली घटना.#STbus#maharashtrapic.twitter.com/kogxcg5imO
— Lokmat (@lokmat) May 13, 2022