नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाला बेलापूरसह ऐरोली मतदारसंघ सोडल्यामुळे नवी मुंबईमधील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दुस-या दिवशीही राजीनामा सत्र सुरूच होते. बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशाराही काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पक्षाच्या नेत्यांनी नाराज पदाधिकाºयांना शांत राहण्याचे व युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.नवी मुंबईमधील एकही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला नसल्यामुळे येथील शिवसैनिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. सोमवारी वाशीमधील मध्यवर्ती शाखेमध्ये बेलापूर मतदारसंघातील पदाधिकारी एकत्र आले होते. शहरप्रमुख विजय माने यांच्यासह २०० पेक्षा जास्त पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत. बेलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मंगळवारी मध्यवर्ती कार्यालयात ऐरोली मतदारसंघातील पदाधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली. नगरसेवक एम. के. मढवी, संजू वाडे, प्रवीण म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भाजप उमेदवाराचे काम करणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया काही पदाधिकाºयांनी व्यक्त केली. ऐरोलीतही काही पदाधिकाºयांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.शिवसेना पदाधिकाºयांनी राजीनामा दिला असला तरी बेलापूरचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोलीचे द्वारकानाथ भोईर यांनी मात्र युतीचेच काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नाराज असलेल्या पदाधिकाºयांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. नवी मुंबईमधील एक मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, असा आमचा आग्रह होता; परंतु चर्चेनंतर दोन्ही मतदारसंघ भाजपला गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे युतीचे काम केले जाईल, असेही दोन्ही जिल्हाप्रमुखांनी स्पष्ट केले आहे. पदांचा राजीनामा देण्यावरून सेनेच्या पदाधिकाºयांमध्ये दोन गट पडले आहेत. अद्याप एकही नगरसेवकाने राजीनामा दिलेला नाही.बेलापूर मतदारसंघातून विजय माने व ऐरोलीमधून नगरसेवक एम. के. मढवी यांनी अपक्ष अर्ज भरावा, असा आग्रह काही पदाधिकाºयांनी धरला आहे; परंतु प्रत्यक्षात ही बंडखोरी टिकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नवी मुंबईमधील एक मतदारसंघ मिळावा, अशी शिवसैनिकांची भावना होती; परंतु युतीमध्ये दोन्ही मतदारसंघ भाजपला दिले आहेत. पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे आम्ही भाजप उमेदवाराचा प्रचार करू. नाराज झालेल्या पदाधिकाºयांनाही पक्षाची भूमिका समजावून सांगितली जाईल.- विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, बेलापूरबंडखोरीवरून पक्षात दोन गटयुतीमध्ये एकही मतदार शिवसेनेला मिळाला नसल्याने शिवसेना पदाधिकाºयांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविण्याचा आग्रह काही पदाधिकाºयांनी धरला आहे; परंतु दोन्ही जिल्हाप्रमुखांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. भाजप उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची भूमिका घेतली आहे. बहुतांश नगरसेवकांनीही अद्याप राजीनामा देण्याविषयी काहीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे बंडखोरी करण्यावरून दोन गट असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन दिवसांत नाराज पदाधिकाºयांची समजूत घालण्याचे प्रयत्नही केले जाणार आहेत.पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणेच काम केले जाईल. नाराज असलेल्या पदाधिकाºयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.- द्वारकानाथ भोईर,जिल्हाप्रमुख,ऐरोली
Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमध्ये शिवसेनेत खदखद, बेलापूरसह ऐरोलीमधील पदाधिकाऱ्यांचीही नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 2:48 AM